Lokrakshanay
Wednesday, June 24, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचा आदेश; रस्त्यांची कामे ७ जूनपर्यंत पूर्ण न झाल्यास कंत्राट रद्द करा

सध्या सुरू असलेली रस्त्यांची कामे संबंधित कंत्राटदारांनी ३१ मे पूर्वी पूर्ण करावीत. तसेच, येत्या ७ जून पूर्वी हे रस्ते पूर्णपणे वाहतूकयोग्य झाले पाहिजेत. अन्यथा त्यांच्याकडून ते काम काढून घ्यावे, असे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 29, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचा आदेश; रस्त्यांची कामे ७ जूनपर्यंत पूर्ण न झाल्यास कंत्राट रद्द करा
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : महानगरपालिका प्रशासनातर्फे मुंबईत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामातील दिरंगाई आणि गुणवत्तेशी तडजोड अजिबात खपवून घेतली जाणार नाही. सध्या सुरू असलेली रस्त्यांची कामे संबंधित कंत्राटदारांनी ३१ मे पूर्वी पूर्ण करावीत. तसेच, येत्या ७ जून पूर्वी हे रस्ते पूर्णपणे वाहतूकयोग्य झाले पाहिजेत. अन्यथा त्यांच्याकडून ते काम काढून घ्यावे आणि अन्य दुसऱ्या कंत्राटदाराची नेमणूक करून कामे पूर्ण करावीत. तसेच, या कामांचा खर्च मूळ कंत्राटदाराकडून वसूल करावा. तसेच संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबई महानगरात ठिकठिकाणी रस्ते बांधणी व दुरुस्तीची कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत. बांगर यांनी ठिकठिकाणी रस्ते कामांची पाहणी केली. आर दक्षिण आणि आर मध्य विभागातील रस्त्यांच्या कामांची नुकतीच पाहणी करून आढावा घेतला. रस्ते कामाशी संबंधित असलेल्या विविध विभागांनी आपापसात योग्य समन्वय ठेवून वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने कामे पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रित करावे. पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये, तसेच अपूर्ण कामांमुळे कोणतीही जीवितहानी होवू नये यासाठी सुरू असलेल्या रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे आहे.

येत्या २८ मे रोजी रस्ते कामांचे मूल्यमापन करावे. ज्या रस्त्यांच्या कामांची प्रगती समाधानकारक आढळणार नाही त्याच्याशी संबंधित कंत्राटदारांना नोटीस जारी करावी. तसेच, ३१ मेपर्यंत रस्त्याची कामे पूर्ण न केल्यास आणि ७ जून पर्यंत रस्ते वाहतूक योग्य स्थितीत न आणल्यास त्यांच्याकडून ते कंत्राट काढून घ्यावे. त्यानंतर संबंधित कामासाठी अन्य कंत्राटदाराची नियुक्ती करून काम पूर्ण करून घ्यावे. या कामाचा संपूर्ण खर्च व दंड मूळ नियुक्त कंत्राटदाराकडून तात्काळ वसूल करावा, असे आदेश बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ही कार्यपद्धती मुंबईत सुरू असलेल्या सर्व रस्ते कामांसाठी लागू असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पावसाळ्यात नागरिकांचा प्रवास सुकर व सुरक्षित व्हावा, यासाठी तात्काळ रस्ते खड्डेमुक्त करण्यात यावेत. रस्त्यांच्या कडेला असलेला राडारोडाही तात्काळ उचलून घ्यावा, अशाही सूचना बांगर यांनी यावेळी दिल्या. या पाहणी दौऱ्यात उप आयुक्त उल्हास महाले, सहायक आयुक्त संध्या नांदेडकर, प्रमुख अभियंता मनीष पटेल यांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी पाहणी; पावसाळ्यापूर्वीच सागरी किनारा प्रकल्पातील बोगद्यांना गळती

Next Post

नेरूळमध्ये बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या चार बांगलादेशींना अटक

Next Post
कामावरून काढून टाकल्याचा राग, कंपनीच्या व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला; चौघा हल्लेखोरांपैकी एकाला अटक

नेरूळमध्ये बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या चार बांगलादेशींना अटक

BreakingNews

टेलिग्रामवरील तात्पुरती बंदी उठली!

माहितीचा अधिकार नियम २०२६ विरोधात अण्णा हजारे मैदानात!

बेस्टचा संप मिटला, मुंबईत बस सेवा पुन्हा सुरू!

चहाविक्रेत्याच्या सतर्कतेमुळे बनावट नोटांचा भांडाफोड; पुण्यात दोघांना अटक!

७०० रुपयांच्या पगारापासून लोकप्रियतेच्या शिखरापर्यंत; ‘बाघा’चा प्रेरणादायी प्रवास!

शिक्षण अधिकाऱ्यांना आता नियमित शाळा भेटी अनिवार्य; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.