Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाणे पोलिसांनी केली तीनजणांना अटक बनावट सिमकार्डद्वारे करत होते बँकेची कर्ज वसुली

ठाण्यातील एका महिलेने बँकेतून कोणतेही कर्ज घेतलेले नसतानाही तिला कर्ज वसुली प्रतिनिधीने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली होती.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 10, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
ठाणे पोलिसांनी केली तीनजणांना अटक बनावट सिमकार्डद्वारे करत होते बँकेची कर्ज वसुली
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : मोबाईल सिमकार्ड खरेदी करणाऱ्या ग्राहकाच्या नावाने दोन ते तीन सिमकार्ड काढून त्यापैकी एक ग्राहकाला देऊन उर्वरित सिमकार्डचा बँक कर्ज वसुलीसाठी वापर केला जात असल्याची बाब ठाणे पोलिसांच्या कारवाईतून उघडकीस आली आहे. ठाण्यातील एका महिलेने बँकेतून कोणतेही कर्ज घेतलेले नसतानाही तिला कर्ज वसुली प्रतिनिधीने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान हे बनावट सिमकार्डचे प्रकरण उघड झाले असून या प्रकरणी तीनजणांना ठाणे पोलिसांनी तीनजणांना अटक केली आहे. मोबाईल सिमकार्ड कंपनीचा कर्मचारी राहुलकुमार टिळकधारी दुबे (३३), बँक कर्ज वसुली कंपनीचा मालक शुभम कालीचरण ओझा (२९) आणि टेलीकॉलर अमित मंगला पाठक (३३) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. ठाण्यातील एका महिलेने कोणत्याही बँकेतून कर्ज घेतलेले नव्हते. तरीही कर्ज वसुलीसाठी त्यांना बँक कर्ज वसुली प्रतिधीकडून फोन येत होते. या फोनद्वारे त्यांना आणि त्यांच्या कुटूंबियांना शिवीगाळ करत अश्लील भाषेत बोलून नाहक त्रास दिला जात होता. या प्रकरणामुळे मानसिक त्रास होत असल्याने महिलेने ठाणे पोलिसांकडे तक्रार केली होती. यानुसार चितळसर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा समांतर तपास ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मालोजी शिंदे यांनी सुरू केला होता. या तपासादरम्यान, बनावट सिमकार्डचे प्रकरण उघडकीस आले.

तक्रारदार महिलेला ज्या क्रमांकावरून फोन येत होते. त्याचा तपास पोलिसांनी केला. ज्या व्यक्तीच्या नावावर हा क्रमांक आहे. त्याने हे सिमकार्ड घेतलेच नसल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांच्या पथकाने सिमकार्ड विक्रि करणाऱ्या राहुलकुमार दुबे याच्याकडे चौकशी केली. यामध्ये त्याने कंपनीने दिलेले उदीष्ट पुर्ण करण्यासाठी ग्राहकांची फसवणुक करून त्यांच्या नावावर दोन ते तीन सिमकार्ड काढतो आणि त्यापैकी एक सिमकार्ड ग्राहकाला देतो तर, उरलेली सिमकार्ड लोन रिकव्हरी टेली कॉल सेटर सिटीझन कॅपीटल या कंपनीला विकतो, असे सांगितले. त्याआधारे पोलिसांनी कंपनीचा मालक शुभम आणि कर्मचारी अमित या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. तक्रारदार महिलेने कोणतेही कर्ज घेतलेले नसतानाही त्यांना फोन करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून त्यांचेशी अश्लील वर्तन केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. राहुलकुमार, शुभम आणि अमित या तिघांना न्यायालयाने १० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आम्ही कोणतेही कर्ज घेतलेले नव्हते आणि कोणाला जामीनदारही नव्हता. काहीच संबंध नसतानाही आम्हाला नाहक मानसिक त्रास दिला जात होता. यापुर्वी अशाप्रकारच्या मानसिक त्रासातून काहीजणांनी आत्महत्या केल्याचे समोर आलेले आहे. त्यामुळे अशा प्रकारे मानसिक त्रास देणाऱ्यांना अद्दल घडावी यासाठी आम्ही पुढे येऊन ही तक्रार दिली होती. बँकांचा कर्ज वसुलीसाठी नेमलेल्या कंपनीवर वचक असायला हवा पण, तसे होत नसल्यामुळेच असे प्रकार घडत आहेत, अशी प्रतिक्रिया तक्रारदाराने दिली.

Previous Post

कल्याणमध्ये शेअर व्यवहारातून वृद्धांची १९ लाखांची फसवणूक

Next Post

मुंबई महापालिकेचा प्रयत्न ११ जुलैपासून हाजी अली ते वरळी सागरी किनारा मार्गाचा आणखी एक टप्पा खुला होणार

Next Post
मुंबई महापालिकेचा प्रयत्न ११ जुलैपासून हाजी अली ते वरळी सागरी किनारा मार्गाचा आणखी एक टप्पा खुला होणार

मुंबई महापालिकेचा प्रयत्न ११ जुलैपासून हाजी अली ते वरळी सागरी किनारा मार्गाचा आणखी एक टप्पा खुला होणार

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.