Lokrakshanay
Thursday, January 15, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

कल्याणमध्ये शेअर व्यवहारातून वृद्धांची १९ लाखांची फसवणूक

आपण शेअर्समध्ये ऑनलाईन माध्यमातून गुंतवणूक केली तर आपणास अल्पावधीत दामदुप्पट परतावा मिळेल, असे चार भामट्यांनी कल्याण मधील खडकपाडा भागातील आरटीओ परिसरात राहत असलेल्या एका ७० वर्षाच्या वृध्दाला सांंगितले.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 9, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
कल्याणमध्ये शेअर व्यवहारातून वृद्धांची १९ लाखांची फसवणूक
Share on FacebookShare on Whatsapp

कल्याण – आपण शेअर्समध्ये ऑनलाईन माध्यमातून गुंतवणूक केली तर आपणास अल्पावधीत दामदुप्पट परतावा मिळेल, असे चार भामट्यांनी कल्याण मधील खडकपाडा भागातील आरटीओ परिसरात राहत असलेल्या एका ७० वर्षाच्या वृध्दाला सांंगितले. या वृध्दाकडून दोन महिन्यात भामट्यांनी १८ लाख ९० हजार रूपयांची रक्कम उकळून या वृध्दाला आकर्षक परतावा नाहीच, पण मूळ रक्कमही परत न करता फसवणूक केली आहे.प्रदीप सतीशचंद्र जैयस्वाल (७०, रा. संघवी रिजन्सी, आरटीओ कार्यालयाजवळ, कल्याण) असे फसवणूक झालेल्या तक्रारदाराचे नाव आहे. नीलम भाटीया, अलोक चतुर्वेदी आणि इतर दोन जण अशी आरोपींची नावे आहेत. खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी प्रदीप जैयस्वाल यांनी तक्रार केली आहे.पोलिसांंनी सांंगितले, मे महिन्यात तक्रारदार प्रदीप जैयस्वाल यांना आरोपी नीलम भाटीया या अनोळखी महिलेने जैयस्वाल यांच्या मोबाईलवरीव व्हाॅटसपवर एक लघुसंदेश पाठविला. त्यांना संपर्क करून आपण ऑनलाईन शेअऱ् व्यवहारातून गुंतवणूक केली तर आपणास आकर्षक मोबादला मिळेल. भाटीया यांनी जैयस्वाल यांना एक जुळणी पाठवली. ती जुळणी जैयस्वाल यांनी उघडून त्यात त्यांनी स्वताची व्यक्तिगत, बँक खात्यांची माहिती भरणा केली. ही माहिती भरल्यानंतर त्यानंतर त्यांना एचडीएफसी सिक्युरिज २० नावाचे उपयोजन दिसले. या उपयोजन माध्यमातून शेअर व्यवहार करण्यासाठी आपल्या नावाचे खाते उघडले असल्याचे प्रदीप यांना दिसले.

प्रदीप यांनी आपला गुप्त संकेतांंक टाकून त्यामधून गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत आरोपी सांगतिल त्याप्रमाणे रक्कम भरणा करून व्यवहार करू लागले. अशाप्रकारे दोन महिन्यात प्रदीप यांनी १८ लाख ९० हजार रूपये ऑनलाईन व्यवहारत गुंंतविले. या रकमेवर परतावा मिळण्यासाठी प्रदीप आरोपींना संपर्क करू लागले. ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. परतावा मिळत नसेल तर मूळ रक्कम परत करा म्हणून प्रदीप तगादा लावू लागले. ती रक्कमही परत देण्यास आरोपी टाळाटाळ करू लागले. आपली फसवणूक आरोपी करत असल्याचे लक्षात आल्यावर प्रदीप यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली.

Previous Post

नागरिकांच्या मदतीसाठी सर्वोच्च प्राधान्य ; सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

ठाणे पोलिसांनी केली तीनजणांना अटक बनावट सिमकार्डद्वारे करत होते बँकेची कर्ज वसुली

Next Post
ठाणे पोलिसांनी केली तीनजणांना अटक बनावट सिमकार्डद्वारे करत होते बँकेची कर्ज वसुली

ठाणे पोलिसांनी केली तीनजणांना अटक बनावट सिमकार्डद्वारे करत होते बँकेची कर्ज वसुली

BreakingNews

राज्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर राहणार ड्रोन कॅमेऱ्याची नजर!

उल्हासनगरमध्ये खळबळ : ५० लाखांची रोकड जप्त!

मताधिकार मोबाईल ॲप : मतदारांना घरबसल्या शोधता येणार यादीतील नाव आणि मतदान केंद्र!

आता एका सिगारेटसाठी मोजावे लागणार ७२ रुपये?

कल्याण हादरले! २१ वर्षीय एअर होस्टेस तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

अमेरिकेला भारतीय कोळंबीची चटक! शुल्कात वाढ केल्यानंतरही निर्यातीत वाढ

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.