Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

आता राज्यातील एसटी वाहक आणि चालकांना आरामदायी वातानुकूलित विश्रांतीगृहाची सोय

नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल येथील राज्यातील पहिल्या वातानुकूलित चालक-वाहक विश्रांतीगृहाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 16, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
आता राज्यातील एसटी वाहक आणि चालकांना आरामदायी वातानुकूलित विश्रांतीगृहाची सोय
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबई सेंट्रल येथील राज्यातील पहिल्या वातानुकूलित चालक – वाहक विश्रांती गृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. राज्यात अन्यत्रही असे वातानुकूलित विश्रांती कक्ष उभारण्यात येणार आहेत.  एसटी महामंडळाच्या (MSRTC) चालक आणि वाहकांसाठीच्या विश्रांतीगृहांच्या दयनीय अवस्थेबाबत नेहमीच बातम्या अधूनमधून येत असतात. परंतु आता राज्यातील एसटी वाहक आणि चालकांना आरामदायी वातानुकूलित विश्रांतीगृहाची सोय करण्यात आली आहे. यावेळी मुंबईचे पालकमंत्री तसेच शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल या मध्यवर्ती कार्यालयात राज्यातील पहिले वातानुकूलित विश्रांती गृह निर्माण करण्यात आले आहे. या एसटीच्या वाहक आणि चालक यांना येथे विश्रांती घेता येणार आहे. यामुळे प्रवासाची दगदग, थकवा आणि क्षीणही छूमंतर होणार आहे.

मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून हे विश्रांतीगृह बांधण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीद्वारे हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. अशाच प्रकारचे वातानुकूलित विश्रांती कक्ष परळ, कुर्ला नेहरूनगर , बोरिवली नॅन्सी कॉलनी येथील आगारात तयार करण्यात येणार आहेत. ठाण्यातील खोपट बस स्थानकात राज्यातील दुसरा वातानुकूलित कक्ष बांधून तयार झाला आहे. त्याचे लवकरच उद्घाटन होणार आहे.

राज्यातील वेगवेगळ्या एसटी बस आगारातून बसेस घेऊन येणाऱ्या सुमारे तीनशे चालक- वाहकांसाठी तसेच मुंबई आगारातील 100 चालक – वाहकांसाठी सुमारे 90 लाख रुपये खर्चून वातानुकूलित असे 3 अत्याधुनिक विश्रांती कक्ष बांधण्यात आले आहेत. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. या विश्रांती कक्षांमध्ये टू टिअर बॅक बेड सह, करमणूक कक्ष, जेवणासाठी स्वतंत्र हॉल , स्वच्छ आणि टापटीप अशी प्रसाधनगृहे निर्माण करण्यात आली आहेत.

Previous Post

आता दिवाळीला गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या खिशाला कात्री बसणार नाही; एसटीची दिवाळीत भाडेवाढ नाही

Next Post

आशियाई मिनी गोल्फ स्पर्धेेत एमआयटीच्या प्रांजली सुरदुसेला कांस्य

Next Post
आशियाई मिनी गोल्फ स्पर्धेेत एमआयटीच्या प्रांजली सुरदुसेला कांस्य

आशियाई मिनी गोल्फ स्पर्धेेत एमआयटीच्या प्रांजली सुरदुसेला कांस्य

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.