Lokrakshanay
Thursday, July 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

HSRP नंबरप्लेटसाठी आता मुदतवाढ नाही; नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू – प्रताप सरनाईक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 2, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
HSRP नंबरप्लेटसाठी आता मुदतवाढ नाही; नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू – प्रताप सरनाईक
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी नंबरप्लेटसाठी (एचएसआरपी) बसविण्यासाठी यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. एचएसआरपी नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर १ जुलैपासून दंडात्मक कारवाई सुरू झाली असून ती पुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सर्व वाहनधारकांना तातडीने उच्च सुरक्षा क्रमांकफलक बसवून घेण्याचे आवाहन केले. सरनाईक म्हणाले की, एचएसआरपी क्रमांकफलक बसविण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वी तब्बल पाच वेळा मुदतवाढ दिली होती. डिसेंबर २०२४ मध्ये निविदा प्रक्रियेला गती देण्यात आली आणि त्यानंतर तीन कंपन्यांना हे काम देण्यात आले. राज्यातील २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सुमारे दोन कोटी दहा लाख वाहनांसाठी एचएसआरपी क्रमांकफलक बंधनकारक करण्यात आला होता. या प्रक्रियेसाठी ३० जून ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. मुदत संपल्यानंतर १ जुलैपासून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे क्रमांकफलक अत्यंत महत्त्वाचे असल्याने वाहनधारकांनी विलंब न करता ते बसवून घ्यावेत, असे आवाहन त्यांनी पुन्हा केले.

परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले की, एचएसआरपी क्रमांकफलकासाठी यापुढे कोणतीही अतिरिक्त मुदत दिली जाणार नाही. राज्यात अद्याप सुमारे एक कोटी आठ लाख वाहनांवर हे क्रमांकफलक बसविण्यात आलेले नाहीत. ३० जूनपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार केवळ ४९ टक्के वाहनधारकांनी एचएसआरपी क्रमांकफलक बसविले असून उर्वरित ५१ टक्के वाहनांवर अद्याप ते बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई सातत्याने सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. या क्रमांकफलकासाठी आकारले जाणारे शुल्कही माफक असून निविदा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने उच्च सुरक्षा क्रमांकफलक अनिवार्य असून, दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाने यास प्राधान्य दिले होते. वाहनांची ओळख अचूकपणे पटविणे, गुन्ह्यांचा तपास सुलभ करणे आणि सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करणे या उद्देशाने ही व्यवस्था लागू करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी तातडीने एचएसआरपी क्रमांकफलक बसवून घ्यावेत, असे आवाहन प्रताप सरनाईक यांनी केले.

 

Previous Post

‘पीओपी’ गणेशमूर्ती विसर्जनाबाबत गेल्या वर्षीचीच पद्धत कायम ठेवण्याची राज्य सरकारची उच्च न्यायालयात विनंती

Next Post

महागाईचा बाप्पावरही परिणाम; गणेशमूर्तींच्या किमतीत २५ ते ३० टक्क्यांची वाढ!

Next Post
महागाईचा बाप्पावरही परिणाम; गणेशमूर्तींच्या किमतीत २५ ते ३० टक्क्यांची वाढ!

महागाईचा बाप्पावरही परिणाम; गणेशमूर्तींच्या किमतीत २५ ते ३० टक्क्यांची वाढ!

BreakingNews

महागाईचा बाप्पावरही परिणाम; गणेशमूर्तींच्या किमतीत २५ ते ३० टक्क्यांची वाढ!

HSRP नंबरप्लेटसाठी आता मुदतवाढ नाही; नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू – प्रताप सरनाईक

‘पीओपी’ गणेशमूर्ती विसर्जनाबाबत गेल्या वर्षीचीच पद्धत कायम ठेवण्याची राज्य सरकारची उच्च न्यायालयात विनंती

पावसाचा रेड-ऑरेंज अलर्ट फक्त कागदावरच? मुसळधार पावसातही रेनकोट-छत्रीसह विद्यार्थ्यांची उपस्थिती!

राज्यात मुसळधार पावसाचा कहर; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरला रेड अलर्ट!

कोपरी-पाचपाखाडीत मतदार पुनरिक्षण मोहिमेला वेग; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘Enumeration Form’चे वाटप

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.