Lokrakshanay
Thursday, July 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

महागाईचा बाप्पावरही परिणाम; गणेशमूर्तींच्या किमतीत २५ ते ३० टक्क्यांची वाढ!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 2, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
महागाईचा बाप्पावरही परिणाम; गणेशमूर्तींच्या किमतीत २५ ते ३० टक्क्यांची वाढ!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवावर महागाईची छाया पडली असून गणेशमूर्तींच्या किमतीत २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, इंधन दरवाढ, वाहतूक खर्च, पाणीटंचाई आणि कुशल कारागिरांच्या वाढलेल्या मजुरीमुळे मूर्ती निर्मितीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक मूर्तीकारांनी यंदा मूर्तींच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेतला असून त्याचा थेट परिणाम गणेशभक्तांच्या खिशावर होणार आहे. यंदा १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत असून सध्या राज्यभरातील मूर्ती कार्यशाळांमध्ये रंगकाम, अंतिम सजावट आणि मूर्ती पूर्ण करण्याची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र उत्पादन खर्चात झालेल्या वाढीमुळे मूर्तीकार आर्थिक ताणाखाली काम करत आहेत. गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणारे प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडू माती, रंग, रसायने, ताडपत्री, प्लास्टिक आच्छादन आणि इतर साहित्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या एका पोत्याची किंमत सुमारे ५० रुपयांनी वाढली असून पूर्वी सुमारे २५० रुपयांना मिळणारे पोते आता ३०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे प्रत्येक मूर्तीमागील उत्पादन खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. महागाईमुळे लहान तसेच मोठ्या मूर्तींच्या किमती वाढविण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे मूर्तीकारांचे म्हणणे आहे.

याशिवाय इंधन दरवाढीमुळे कच्चा माल कार्यशाळांपर्यंत पोहोचविण्याचा तसेच तयार मूर्ती राज्यातील विविध शहरांमध्ये वाहतूक करण्याचा खर्चही वाढला आहे. काही भागांमध्ये पाणीटंचाई असल्यामुळे मूर्ती तयार करताना पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा लागत आहे. त्याचबरोबर कुशल कारागिरांच्या मानधनातही वाढ झाल्याने उत्पादन खर्च आणखी वाढला आहे. मूर्तीकारांच्या मते, रंग, प्लास्टर, शाडू माती, सजावटीचे साहित्य आणि वाहतूक खर्चात झालेल्या वाढीमुळे गणेशमूर्तींच्या किमती २५ ते ३० टक्क्यांनी वाढवाव्या लागत आहेत. तरीही गणेशभक्तांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक मूर्ती शक्य तितक्या माफक दरात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. महागाई असूनही गणेशभक्तांकडून मूर्तींची मागणी आणि आगाऊ नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही मूर्तीकारांनी नमूद केले. यंदाच्या गणेशोत्सवात भक्तीभाव कायम असला, तरी वाढत्या महागाईमुळे गणेशमूर्तींसह उत्सवाच्या एकूण खर्चात वाढ होणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.

 

Previous Post

HSRP नंबरप्लेटसाठी आता मुदतवाढ नाही; नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू – प्रताप सरनाईक

Next Post

जन्म-मृत्यू नोंदणीबाबत नवे निर्देश; २१ दिवसांत नोंदणी बंधनकारक!

Next Post
जन्म-मृत्यू नोंदणीबाबत नवे निर्देश; २१ दिवसांत नोंदणी बंधनकारक!

जन्म-मृत्यू नोंदणीबाबत नवे निर्देश; २१ दिवसांत नोंदणी बंधनकारक!

BreakingNews

जन्म-मृत्यू नोंदणीबाबत नवे निर्देश; २१ दिवसांत नोंदणी बंधनकारक!

महागाईचा बाप्पावरही परिणाम; गणेशमूर्तींच्या किमतीत २५ ते ३० टक्क्यांची वाढ!

HSRP नंबरप्लेटसाठी आता मुदतवाढ नाही; नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू – प्रताप सरनाईक

‘पीओपी’ गणेशमूर्ती विसर्जनाबाबत गेल्या वर्षीचीच पद्धत कायम ठेवण्याची राज्य सरकारची उच्च न्यायालयात विनंती

पावसाचा रेड-ऑरेंज अलर्ट फक्त कागदावरच? मुसळधार पावसातही रेनकोट-छत्रीसह विद्यार्थ्यांची उपस्थिती!

राज्यात मुसळधार पावसाचा कहर; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरला रेड अलर्ट!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.