Lokrakshanay
Wednesday, October 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

ऐन दिवाळीत एसटी पुन्हा कोलमडणार? ५ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा इशारा!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 21, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
ऐन दिवाळीत एसटी पुन्हा कोलमडणार? ५ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा इशारा!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : राज्य परिवहन (एसटी) कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक व प्रशासकीय मागण्या दिवाळीपूर्वी पूर्ण न झाल्यास ५ नोव्हेंबरपासून राज्यभरातील सर्व आगार आणि विभागीय कार्यालयांसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने दिला आहे. आंदोलनाची सुरुवात ३ नोव्हेंबरला घंटानाद आणि निदर्शनांनी, तर ४ नोव्हेंबरला द्वारसभा घेऊन करण्यात येणार आहे. २ नोव्हेंबरपर्यंत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी संघटनेची मागणी आहे. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपयांची दिवाळी भेट आणि १२ हजार ५०० रुपयांची सण उचल देण्यात यावी, तसेच ऑक्टोबर महिन्याचे वेतन २ नोव्हेंबरला अदा करावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. याशिवाय २०१६ पासूनची वार्षिक वेतनवाढ व घरभाडे भत्त्याची थकबाकी, २०१८ पासूनचा महागाई भत्त्याचा फरक तातडीने देण्याबरोबरच जानेवारी २०२६ पासून महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्याची आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्याची मागणीही संघटनेने केली आहे.

आर्थिक मागण्यांबरोबरच विविध प्रशासकीय प्रश्नांवरही संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. महिला सन्मान आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या एनसीएमसी कार्डातील त्रुटी दूर करून आगारांमध्ये कार्ड टॉप-अपची सुविधा उपलब्ध करावी, यूपीआय व्यवहारांमुळे वाहकांना होणारा त्रास कमी करावा, तसेच एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी कॅशलेस वैद्यकीय सुविधा लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कंत्राटी भरती थांबवून महामंडळाच्या मालकीच्या जागांचा विकास स्वतः करावा, भाडेतत्त्वावरील ई-बस करार रद्द करून स्वमालकीच्या बस खरेदी कराव्यात, तसेच महिला कर्मचाऱ्यांच्या प्रसूती रजेसंदर्भातील परिपत्रक रद्द करावे, अशीही मागणी आहे. अधिकाऱ्यांकडील नियमभंगाकडे दुर्लक्ष होत असताना कर्मचाऱ्यांवर किरकोळ कारणांवर कठोर कारवाई केली जात असल्याचा आरोप संघटनेने केला असून, दिवाळीपूर्वी मागण्यांवर तोडगा न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Previous Post

आंबा उत्पादक शेतकऱ्यांनो लक्ष द्या! फळपिक विम्यासाठी ३० नोव्हेंबर शेवटची मुदत

Next Post

पनवेलमध्ये ध्वनीप्रदूषणाविरोधात पोलिसांचा ‘बुलडोझर’; विजयादशमीला १११ मॉडिफाइड सायलेन्सर नष्ट!

Next Post
पनवेलमध्ये ध्वनीप्रदूषणाविरोधात पोलिसांचा ‘बुलडोझर’; विजयादशमीला १११ मॉडिफाइड सायलेन्सर नष्ट!

पनवेलमध्ये ध्वनीप्रदूषणाविरोधात पोलिसांचा ‘बुलडोझर’; विजयादशमीला १११ मॉडिफाइड सायलेन्सर नष्ट!

BreakingNews

पनवेलमध्ये ध्वनीप्रदूषणाविरोधात पोलिसांचा ‘बुलडोझर’; विजयादशमीला १११ मॉडिफाइड सायलेन्सर नष्ट!

ऐन दिवाळीत एसटी पुन्हा कोलमडणार? ५ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा इशारा!

आंबा उत्पादक शेतकऱ्यांनो लक्ष द्या! फळपिक विम्यासाठी ३० नोव्हेंबर शेवटची मुदत

५० वर्षांचा संघर्ष संपला; हनुमाननगर-चंद्रनगरच्या ग्रामस्थांना मिळणार जमिनीचा मालकी हक्क – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पाणीटंचाईत टँकर बुकिंगसाठी फोन करण्याचे टेन्शन मिटले; आता ॲपवरून करा वॉटर टँकर बुक!

महाराष्ट्रातील मच्छिमारांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवा प्रयोग; आंध्रच्या कोळंबी प्रकल्पांची मंत्री नितेश राणेंकडून पाहणी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.