Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

नवी मुंबई महापालिका शिक्षकांची प्रक्रियेला सुरुवात; शिक्षकांच्या गणवेशासाठी मतदान

राज्य शासनाच्या १५ मार्चच्या शिक्षकांच्या गणवेशाबाबतच्या परिपत्रकानुसार नवी मुंबईतही शिक्षकांचा गणवेश निश्चित करण्यासाठी ऑनलाइन लिंक पाठवून शिक्षकांच्या मतदानाचा कौल घेतला जाणार आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 23, 2024
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
नवी मुंबई महापालिका शिक्षकांची प्रक्रियेला सुरुवात; शिक्षकांच्या गणवेशासाठी मतदान
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : राज्य शासनाच्या १५ मार्चच्या शिक्षकांच्या गणवेशाबाबतच्या परिपत्रकानुसार नवी मुंबईतही शिक्षकांचा गणवेश निश्चित करण्यासाठी ऑनलाइन लिंक पाठवून शिक्षकांच्या मतदानाचा कौल घेतला जाणार आहे. त्याची सुरुवात नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने केली असून ४६० शिक्षकांनी लिंकद्वारे गणवेशाबाबत मतदानाचा कौल दिला आहे. शिक्षकांचा संबंध हा भावी पिढीशी येत असून त्यांच्या गणवेशाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करीत असताना शिक्षकांनी वेशभूषेबाबत जागरूक राहून आपली वेशभूषा ही आपल्या पदास अनुरूप असावी असे पत्रकात म्हटले असून विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असल्याने शिक्षक व शिक्षिकांना गणवेशाबाबत योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षकांच्या गणवेशाची बाब विचारात घेता गणवेश कसा असावा त्याचा रंग कसा असावा याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

नवी मुंबई महापालिकेनेही आपल्या अखत्यारीत येणाऱ्या पालिकेच्या पूर्वप्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचा गणवेश निश्चित केल्याप्रमाणे त्याचा रंगनिश्चितीसाठी लिंकद्वारे मतदानाचा कौल घेतला जात आहे. त्यात महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार, चुडीदार, कुर्ता व दुपट्टा तर पुरुष शिक्षकांनी जीन्स, टी शर्ट न वापरता पॅन्ट-शर्ट असा पेहराव करावा तसेच चित्र-विचित्र नक्षीदार कपडे परिधान करून नयेत, असे शिक्षण विभागाच्या आदेशात म्हटले आहे. शिक्षकांनी कोणत्या रंगाचा पेहराव करावा हे त्या शाळेने निश्चित करावे असे सांगितले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण विभागाने महिला शिक्षकांसाठीची साडी व कुर्ती तसेच पुरुष शिक्षकांच्या शर्टचा रंग निश्चित करण्यासाठी मतदान घेण्यासाठी संबंधित शिक्षकांना लिंक पाठवली आहे. त्यानुसार लिंकद्वारे साडी किंवा कुर्ती आणि शर्ट यांचा रंग निश्चित झाल्यावर त्या आधारे स्त्री शिक्षकांसाठीचा ब्लाऊज व सलवार तसेच पुरुष शिक्षकांच्या पॅन्टचा रंग निश्चित करण्यासाठी मतदान घेण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेतील सर्व शिक्षकांच्या मोबाइलवर फॉर्मची लिंक पाठवण्यात आली असून हा फॉर्म तात्काळ भरून देण्याचे आवाहन देण्यात आले आहे.

१६५ –  पूर्वप्राथमिक शिक्षक

८५९ – प्राथमिक शिक्षक

१९२ – माध्यमिक शिक्षक

राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने दिलेल्या मार्च महिन्यातील परिपत्रकानुसार नवी मुंबई महापालिकेतील शिक्षकांच्या गणवेशाबाबत लिंकद्वारे मतदानाचा कौल घेण्यात येत असून याबाबत शिक्षकांना लिंक पाठवण्यात आली असून त्याद्वारे अंतिम रंगनिश्चिती करण्यात येणार आहे. सर्व शिक्षकांना लिंक पाठवण्यात आली असून आतापर्यंत ४६० शिक्षकांनी लिंक पाठवली आहे. – अरुणा यादव, शिक्षणाधिकारी, नवी मुंबई महापालिका

Previous Post

मालमत्ता करापोटी पालिकेच्या तिजोरीत ४३२० कोटी जमा; पालिकेचा करदात्यांना इशारा

Next Post

१०.६७ टक्केच धरणामध्ये पाणीसाठा शिल्लक; मुंबईवर पाणी कपातीचे संकट

Next Post
पुणेकरांकडून चार दिवसांत ४०० तक्रारी; पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची ‘संततधार’

१०.६७ टक्केच धरणामध्ये पाणीसाठा शिल्लक; मुंबईवर पाणी कपातीचे संकट

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.