Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

सुट्टीच्या दिवशी पालिकेची धडक कारवाई; रेल्वे स्थानक परिसर केला फेरीवाला मुक्त!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 27, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
सुट्टीच्या दिवशी पालिकेची धडक कारवाई; रेल्वे स्थानक परिसर केला फेरीवाला मुक्त!
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : दिवाळी सण संपताच सुट्टीचे दिवस असुनही शनिवार आणि रविवारी कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवलीतील फ आणि ग प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी फेरीवाला आणि तोडकाम पथक घेऊन डोंबिवली पूर्वेतील रेल्वे स्थानक परिसरातील १५० मीटरच्या आतील आणि परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांचे सामान जप्त केले. दुकानांसमोरील लोखंडी पायऱ्या, अडथळे, निवारे जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. शनिवार, रविवार पालिका कार्यालयाला सुट्टी असल्याने आपण आता मस्त रस्ते, पदपथ अडवून व्यवसाय करू, अशा थाटात फेरीवाल्यांनी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात आपली दुकाने, टपऱ्या, मंच थाटले होते. पथाऱ्या टाकून जागा अडवून व्यवसाय सुरू केले होते. फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर, ग प्रभागाचे साहाय्यक भारत पवार यांनी दोन्ही प्रभागाची फेरीवाला हटाव आणि तोडकाम पथके एकत्र करून डोंबिवली पूर्व भागात शनिवारी, रविवारी सकाळी अचानकपणे कारवाई सुरू केली.

एकावेळी ३० ते ४० कामगार, जेसीबी रेल्वे स्थानक भागातील बाजारात कारवाई करू लागल्याने फेरीवाल्यांची दाणादाण उडाली. एकाही फेरीवाल्याला सामानासह पळून जाण्याची संधी न देता त्यांचे सामान पथकाने जप्त केले. दुकानदारांनी दुकानासमोर पावसाळी झड येऊ नये म्हणून निवारे उभारले होते. दुकानासमोर घट्ट लोखंडी पायऱ्या बनविल्या होत्या. यामुळे पादचाऱ्यांना चालणे शक्य होत नव्हते. अनेक फेरीवाल्यांनी सामान ठेवण्यासाठी झाड, विजेचे खांब यांच्या आडोशाने मंच, ठेले उभारले होते. दुकानदार आणि फेरीवाल्यांचे हे सर्व आधार तोडून टाकून साहाय्यक आयुक्त मुंबरकर आणि साहाय्यक आयुक्त पवार यांनी फेरीवाल्यांचे कणे मोडून काढले. या कारवाईतून फुगे विक्रेतेही सुटले नाहीत. यापूर्वी फ प्रभागात कारवाई केली की फेरीवाले रामनगर ग प्रभागात पळून जात होते. आता एकाचवेळी फ आणि ग प्रभागात कारवाई करण्यात आली. त्यामुळे फेरीवाल्यांची कोंडी झाली. एका नारळ विक्रेत्याने तोडलेले बांधकाम पुन्हा रात्रीतून उभारले ते पक्के बांधकाम पुन्हा तोडण्यात आले. फेरीवाल्यांच्या टपऱ्या, हातगाड्यांचा जागीच जेसीबीच्या साहाय्याने चुरा करण्यात आला. सिमेंटचे ओटले जेसीबाच्या साहाय्याने खरवडून काढण्यात आले. या कारवाईच्या शहर विद्रुप करणारे, पालिकेच्या परवानग्या न घेता लावलेले ५० हून अधिक बेकायदा फलक हटविण्यात आले. ४० निवारे, १२ टपऱ्या, १० ओटले, ६ ठेले तोडण्यात आले. या कारवाईसाठी रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून दिला होता. कारवाई सुरू असताना कोणीही फेरीवाला विरोध करण्यासाठी पुढे आला नाही. बहुतांशी फेरीवाले मुंब्रा, भायखळा, मस्जिद बंदर, अंधेरी परिसरातील रहिवासी आहेत. ते व्यवसायानिमित्त डोंबिवली भागात राहतात.

Previous Post

अभिनेत्री निवेदिता सराफ यांना ‘गंधार गौरव पुरस्कार’ जाहीर

Next Post

छठ पूजेसाठी ‘अर्ध्य’ देण्यासाठी नैसर्गिक तलावात परवानगी

Next Post
छठ पूजेसाठी ‘अर्ध्य’ देण्यासाठी नैसर्गिक तलावात परवानगी

छठ पूजेसाठी ‘अर्ध्य’ देण्यासाठी नैसर्गिक तलावात परवानगी

BreakingNews

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६,७२८ कोटींचा निधी; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.