Lokrakshanay
Thursday, April 23, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

अभिनेत्री निवेदिता सराफ यांना ‘गंधार गौरव पुरस्कार’ जाहीर

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 27, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या, मनोरंजन
अभिनेत्री निवेदिता सराफ यांना ‘गंधार गौरव पुरस्कार’ जाहीर
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : हिंदी, मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीतील चतुरस्त्र अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा बाल दिनाच्या औचित्य साधून १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वा. गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात असून निवेदिता यांना हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांच्या हस्ते देण्यात येणार आहे अशी माहिती ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रदीप ढवळ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ सन्मानचिन्ह ११,१११ रुपये रोख असे आहे. तसेच, दोन वर्षांपूर्वी पासून गंधार बालकलाकार पुरस्कार सुरू केला असून यंदाचा पुरस्कार हा यंदा गायन क्षेत्रातील स्वरा जोशी हिला देण्यात येणार आहे.

गंधार या बालनाट्य संस्थेच्यावतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाचे हे दहावे वर्षे आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, विद्या पटवर्धन, दिलीप प्रभावळकर, अशोक समेळ, नरेंद्र आंगणे, अतुल परचुरे, सचिन पिळगावकर, गेल्यावर्षी महेश कोठारे तर विजय गोखले यांना आतापर्यंत गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांना देण्यात येत आहे. पद्मश्री अशोक सराफ, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रदीप ढवळ, आमदार संजय केळकर व इतर यांच्या हस्ते निवेदिता सराफ यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. यावेळी बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के – सामंत देखील उपस्थित राहणार आहेत. मे महिन्यात गंधारतर्फे विविध जिल्ह्यांत गंधार गौरव बालनाट्य स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे येथून प्रवेश आले होते. या स्पर्धेसाठी हर्षदा बोरकर आणि अमोघ चंदन यांनी परीक्षण केले होते. १५ बालनाट्यांनी यात प्रवेश घेतला होता.

Previous Post

‘या’ सरकारी बँकेचा हप्ता न भरल्यास थेट AI करणार कॉल

Next Post

सुट्टीच्या दिवशी पालिकेची धडक कारवाई; रेल्वे स्थानक परिसर केला फेरीवाला मुक्त!

Next Post
सुट्टीच्या दिवशी पालिकेची धडक कारवाई; रेल्वे स्थानक परिसर केला फेरीवाला मुक्त!

सुट्टीच्या दिवशी पालिकेची धडक कारवाई; रेल्वे स्थानक परिसर केला फेरीवाला मुक्त!

BreakingNews

BESTची डिजिटल झेप; Google Pay, PhonePe सह २८ ॲप्सवरून तिकीट खरेदीची सुविधा

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.