Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबईची लाईफ लाईन अक्षरश: डेथ लाईन; लोकल प्रवासात ७ महिन्यात ११६१ प्रवाशांचा बळी

लोकल प्रवासात प्रवाशांच्या बळींची धक्कादायक संख्या

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 1, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
मुंबईची लाईफ लाईन अक्षरश: डेथ लाईन; लोकल प्रवासात ७ महिन्यात ११६१ प्रवाशांचा बळी
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबईची लाईफ लाईन अक्षरश: डेथ लाईन बनली आहे. लोकलचा प्रवास धकाधकीचा बनला आहे. लोकल ट्रेनचे रोजचे बिघाड आणि गाड्यांना होत असलेला उशीर त्यामुळे सकाळी आणि सायंकाळच्या पिकअवरमध्ये लोकलमधून लटकून प्रवास करावा लागत आहे. तसेच लोकल पकडण्याचा नादात देखील प्रवाशांचा पडून मृत्यू होत आहे. अर्थातच रेल्वे रुळ ओलांडताना सर्वाधिक मृत्यू होत आहेत. गेल्या सात महिन्यात तब्बल ११६१ प्रवाशांचा लोकल प्रवासात मृत्यू झाला आहे. दररोज सरासरी पाच प्रवाशांचा बळी गेला आहे. गेल्या सात महिन्यात जानेवारी २०२४ ते २७ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनूसार तिन्ही मार्गांवर मिळून ११६१ प्रवाशांचे विविध लोकल अपघातात मृत्यू झाले आहेत. मुंबईत लोक सकाळी उत्तरेकडून दक्षिण दिशेकडील आपल्या कार्यालयात जाण्यासाठी प्रवास करीत असतात. या प्रवासात कर्जत – कसारा हून सकाळी पिकअवरमध्ये दक्षिण मुंबईतील कार्यालयात पोहचण्याची घाई असते.

नंतर सायंकाळी हीच गर्दी उलट दिशेला असते. नेमका त्याच वेळी एखादा बिघाड झाल्यास लोकल ट्रेनला मोठी गर्दी होते. सर्वांना् घरी जायची घाई असते. आणि यातून अपघात घडत असतात. पश्चिम रेल्वेवर डहाणू ते चर्चगेट तर मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर पनवेल ते सीएसएमटी असा प्रवास सुरु असतो. मध्य रेल्वे मुख्य मार्ग, हार्बर आणि ट्रान्सहार्बर अशा तिन्ही मार्गावर तीन हजाराहून अधिक लोकल फेऱ्या चालविण्यात येतात. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणपर्यंत मध्य रेल्वेकडे ( दोन धिम्या अप आणि डाऊन आणि दोन जलद अप आणि डाऊन ) चार मार्गिका आहेत. परंतू कल्याणच्या पुढे कर्जत आणि कसारा येथे प्रत्येकी एकच मार्ग ( अप आणि डाऊन ) असल्याने लोकल बिघाड झाल्यास संपूर्ण मार्ग ठप्प होतो. मुंबईची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या लोकलमधून दररोज ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. लोकलमध्ये सकाळ आणि संध्याकाळच्या पिकअवरला बिघाड झाल्यास अपघात घडतात. मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिन्ही प्रमुख मार्गावर मिळून सात महिन्यात ११६१ प्रवाशांना प्राण गमवावा लागला आहे. मध्य रेल्वेचा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प गेली अनेक वर्षे रखडला आहे. परळ ते सीएसएमटी असा हा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प झाल्यास लांबपल्ल्यांच्या गाड्यांना स्वतंत्र मार्गिका मिळून उपनगरीय लोकलची संख्या वाढविणे शक्य होईल असे म्हटले जात आहे. आता पुन्हा मध्य रेल्वेने हार्बर मार्गिका सँडहर्स्ट रोडपर्यंत तोडून हार्बरच्या या मार्गिकांना पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी सॅंडहर्स्ट रोड ते सीएसएमटीपर्यंत वापरण्याची जुनी योजना पुन्हा बाहेर काढली आहे. यामुळे हार्बरच्या प्रवाशांचा प्रचंड तोटा होणार आहे. कारण पनवेलवरुन येणाऱ्या प्रवाशांना सँडहर्स्ट रोड येथे उतरुन टॅक्सी किंवा बसने सीएसएमटी गाठावे लागणार आहे. हार्बरचे शेवटचे स्थानक आता पी.डीमेल्लो रोडच्या जागेत करण्याची योजना आहे.

Previous Post

ठाणे बेलापुर मार्गावर आंदोलनामुळे वाहतूक कोंडी

Next Post

आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची माहिती; कल्याणमधील होर्डिंग दुर्घटनेतील ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार

Next Post
आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची माहिती; कल्याणमधील होर्डिंग दुर्घटनेतील ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार

आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची माहिती; कल्याणमधील होर्डिंग दुर्घटनेतील ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.