Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची माहिती; कल्याणमधील होर्डिंग दुर्घटनेतील ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार

या दुर्घटनेत ज्या वाहन मालकांच्या वाहनांचे नुकसान झाले आहे. जे पादचारी या अपघातात जखमी झाले आहेत. तो सर्व खर्च होर्डिंगच्या ठेकेदाराकडून वसूल केला जाणार आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिली.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 2, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची माहिती; कल्याणमधील होर्डिंग दुर्घटनेतील ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार
Share on FacebookShare on Whatsapp

कल्याण : सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होईल अशा निष्काळजीपणाने होर्डिंगची उभारणी केल्यामुळे सहजानंद चौकातील होर्डिंग दुर्घटनेतील ठेकेदारावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या दुर्घटनेत ज्या वाहन मालकांच्या वाहनांचे नुकसान झाले आहे. जे पादचारी या अपघातात जखमी झाले आहेत. तो सर्व खर्च होर्डिंगच्या ठेकेदाराकडून वसूल केला जाणार आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिली. सहजानंद चौकातील होर्डिंगच्या सांगाड्यावर जाहिरात फलक लावण्यासाठी पत्रे लावण्यात आले होते. हे पत्रे शुक्रवारी सकाळी रस्त्यावर कोसळले. त्यामुळे दोन वाहने, दोन पादचारी या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. होर्डिंग हे सार्वजनिक ठिकाणी असल्याने ते काळजीपूर्वक लावणे आवश्यक होते. या होर्डिंगबाबत निष्काळजीपणा दिसून आला आहे. त्यामुळे या निष्काळजीपणाला संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरून त्याच्यावर भरपाईची, फौजदारी कारवाई केली जाणार आहे, असे आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी सांगितले.

सहजानंद चौकातील दुर्घटनेनंतर आयुक्त डॉ. जाखड यांनी पालिकेच्या दहा प्रभाग हद्दीतील होर्डिंगचे सांगाडे, त्यावरील पत्रे किंवा व्यवस्था सुस्थितीत आहे की नाही यासंदर्भात पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश साहाय्यक आयुक्तांना दिले. पालिका हद्दीत अनेक भागात राजकीय आशीर्वादाने बेकायदा फलक, त्यांचे लोखंडी सांगाडे उभे आहेत. त्या फलकांची माहिती घेऊन ते फलक आणि त्यांचे अनेक वर्षापासूनचे सांगाडे तोडून टाकण्यासाठी आयुक्तांनी पुढाकार घेण्याची मागणी जाहिरात फलक संदर्भातील काही व्यावसायिकांकडून केली जात आहेत. बेकायदा फलकांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली पालिकेला एक पैशाचाही महसूल मिळत नसल्याचे या बेकायदा फलकांच्या विरुध्द पालिकेत तक्रारी करणारे माहिती कार्यकर्ते सुरेश तेलवणे यांनी सांगितले.

Previous Post

मुंबईची लाईफ लाईन अक्षरश: डेथ लाईन; लोकल प्रवासात ७ महिन्यात ११६१ प्रवाशांचा बळी

Next Post

कोट्यवधींचे प्रकल्प पण महापालिकेच्या महसूलात बदल नाही, उलट खर्च दोन लाख कोटी

Next Post
कोट्यवधींचे प्रकल्प पण महापालिकेच्या महसूलात बदल नाही, उलट खर्च दोन लाख कोटी

कोट्यवधींचे प्रकल्प पण महापालिकेच्या महसूलात बदल नाही, उलट खर्च दोन लाख कोटी

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.