Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

निर्भय, नि:पक्ष वातावरणात निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा सज्ज – जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 6, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
निर्भय, नि:पक्ष वातावरणात निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा सज्ज – जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखत निर्भय आणि नि:पक्ष वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले. मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघांतील निवडणुकीच्या तयारीचा आढावा निवडणूक निरीक्षकांनी घेतला. यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक धनंजय सिंह भदोरिया, संजयकुमार खत्री, स्तुती चरण, परवीनकुमार थिंड, केंद्रीय पोलिस निरीक्षक गौरव शर्मा, प्रीती प्रियदर्शनी, केंद्रीय खर्च निरीक्षक नेहा चौधरी, दीपेंद्रकुमार, राजकुमार चंदन, किरण छत्रपती, सुनील यादव, सुरजकुमार गुप्ता, पोलिस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे, वंदना सूर्यवंशी, डॉ दादाराव दातकर, सोनाली मुळे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तेजस समेळ तसेच सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघांतील निवडणुकीच्या तयारीबाबत माहिती दिली.

विविध तपासणी पथकांच्या माध्यमातून वाहनांची तसेच फिनटेक  माध्यमातून  होणाऱ्या पैश्यांच्या व्यवहारांचीही कसून तपासणी करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून विविध ठिकाणी नाकेबंदी वाढविण्यात येत असल्याचे पोलिस सहआयुक्त श्री. चौधरी यांनी सांगितले. मतदान केंद्रे, टोल फ्री क्रमांक, मतदारांसाठीच्या सुविधा, कर्मचारी प्रशिक्षण, वेल्फेअर ऑफिसर, आदर्श आचारसंहिता, ईव्हीएम मशीन, कायदा – सुव्यवस्था, खर्च संनियंत्रण, मतदार जागृती अभियान (स्वीप), जाहिरात प्रमाणीकरण, आपत्कालीन परिस्थितीतील नियोजन यासंदर्भातील आढावा घेण्यात आला. मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक प्रशासनाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या तयारी संदर्भात केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी समाधान व्यक्त केले.

Previous Post

पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार; हजारो विद्यार्थ्यांचा फी न भरल्याने निकाल रखडला

Next Post

रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांनी केला पर्दाफाश

Next Post
रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांनी केला पर्दाफाश

रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा रेल्वे क्राईम ब्रँच पोलिसांनी केला पर्दाफाश

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.