Lokrakshanay
Monday, June 22, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

चहाविक्रेत्याच्या सतर्कतेमुळे बनावट नोटांचा भांडाफोड; पुण्यात दोघांना अटक!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 22, 2026
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या, पुणे
चहाविक्रेत्याच्या सतर्कतेमुळे बनावट नोटांचा भांडाफोड; पुण्यात दोघांना अटक!
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : पुण्यातील ढोले-पाटील रस्त्यावर चहाविक्रेत्याच्या प्रसंगावधानामुळे बनावट नोटांचा वापर करणाऱ्या दोघांचा पर्दाफाश झाला असून कोरेगाव पार्क पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पाचशे रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओमप्रकाश महावीर अगरवाल (वय ३२, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) आणि मौसम नरेंद्र मिश्रा (वय ३६, रा. लोहगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सिद्धराम अशोक बिदनकर (वय २५, रा. ताडीवाला रस्ता) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिदनकर यांचे ढोले-पाटील रस्त्यावर ‘जयमल्हार टी स्टॉल’ नावाचे चहाचे दुकान आहे. शुक्रवारी दुपारी सुमारे तीनच्या सुमारास अगरवाल आणि मिश्रा हे दोघे दुकानात आले. त्यांनी चहा स्टॉलवर सिगारेट खरेदी करताना बिदनकर यांच्या आईकडे पाचशे रुपयांची नोट दिली. व्यवहारादरम्यान नोट संशयास्पद असल्याचे त्यांच्या आईच्या लक्षात आले. त्यांनी नोट नीट तपासल्यानंतर ती बनावट असल्याचा संशय व्यक्त केला आणि तत्काळ याबाबत मुलगा सिद्धराम बिदनकर यांना माहिती दिली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

चौकशीदरम्यान आरोपींनी याच परिसरातील आणखी एका दुकानातही पाचशे रुपयांची बनावट नोट देऊन सिगारेट खरेदी केल्याची माहिती समोर आली. प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन बिदनकर यांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच कोरेगाव पार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले. पुढील तपासात बनावट नोट चलनात आणून फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपींना २५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या पोलिसांकडून या बनावट नोटा आरोपींना नेमक्या कुठून मिळाल्या, त्या तयार करणाऱ्या किंवा पुरवठा करणाऱ्या रॅकेटशी त्यांचा काही संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे. तसेच आरोपींनी यापूर्वीही अशाच प्रकारे बनावट नोटा वापरून इतर दुकानदारांची फसवणूक केली आहे का, याचीही माहिती गोळा केली जात आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार करत असून, तपासातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

 

Previous Post

७०० रुपयांच्या पगारापासून लोकप्रियतेच्या शिखरापर्यंत; ‘बाघा’चा प्रेरणादायी प्रवास!

BreakingNews

चहाविक्रेत्याच्या सतर्कतेमुळे बनावट नोटांचा भांडाफोड; पुण्यात दोघांना अटक!

७०० रुपयांच्या पगारापासून लोकप्रियतेच्या शिखरापर्यंत; ‘बाघा’चा प्रेरणादायी प्रवास!

शिक्षण अधिकाऱ्यांना आता नियमित शाळा भेटी अनिवार्य; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

खड्ड्यांच्या तक्रारींचे २४ तासांत निराकरण करा; महानगरपालिकेच्या अभियंत्यांना निर्देश!

हॉस्पिटलच्या मेडिकलमधूनच औषधे घेण्याची सक्ती आता चालणार नाही! – तुकाराम मुंढे

बेस्ट संपाचा मेट्रोला मोठा लाभ; प्रवाशांचा मेट्रोकडे लक्षणीय ओढा!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.