Lokrakshanay
Wednesday, April 8, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

मुंबई बाहेर गेलेल्या नागरिकांना लवकरच स्वगृही आणणार- मुख्यमंत्री

ठाण्यातील एका कार्यक्रमात मुंबईकरांना मुंबईत पुन्हा आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 10, 2023
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
मुंबई बाहेर गेलेल्या नागरिकांना लवकरच स्वगृही आणणार- मुख्यमंत्री
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ‘काही मुंबईकरांनी त्यांच्या भागातील जुन्या इमारतीचं पुनर्विकास होत असल्यामुळे शहर सोडलं आहे. तर काही मुंबईकरांना त्यांच्या घरांची कामे रखडल्याने त्यांना मुंबईनजीक भागात स्थलांतरीत व्हावं लागलं आहे. या मुंबईकरांना मुंबईत पुन्हा आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी रात्री उशिरा ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी ठाणे, जोगेश्वरी, विक्रोळी आणि धारावी येथील कार्यकर्ते आणि काही माजी नगरसेवक उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मुंबईतील अनेक भागातील इमारती आणि जुन्या घरांच्या पुनर्विकासाचे काम रखडले आहे. मुंबईतील पुनर्विकासाचे काम रखडल्याने अनेक मुंबईकरांना स्थलांतर व्हावे लागले आहे. या मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणण्याचं प्राधान्य सरकारचं आहे. आमचं सरकार हे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने काम करत आहे. मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचं जीवनमान सुधारण्याचं काम सरकार करत आहे’.
तत्पूर्वी, ‘ मुंबईत नाले सफाईच्या कामामुळे बऱ्याच भागात यंदा पावसाळ्यात पाणी साचले नाही, असाही दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला. ‘जेव्हा एखादा मुख्यमंत्री फिल्डवर असतो, तेव्हा पालिकेचे सर्वच कर्मचारी चांगला निकाल देण्यासाठी सज्ज होतात. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याचं काम मी हाती घेतलं आहे. यंदा पावसाळ्यात अनेक भागात पाणी साचले नसल्याने आमच्या प्रयत्नांना यश आलं आहे, असेही ते म्हणाले . दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. गेल्या वर्षी मुंबईत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी केलेल्या ३००० कोटी रुपयांहून अधिक केलेल्या खर्चावर मुख्यमंत्र्यांनी प्रश्न उपस्थित करत ठाकरेंवर निशाणा साधला.

Previous Post

“मी फिल्मइंडस्ट्रीतील शेवटची मुघल…” आशाताई भोसले यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा

Next Post

‘माझी माती, माझा देश’ अभियानाला सुरुवात…’ BMCच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली ‘पंचप्राण’ शपथ

Next Post
‘माझी माती, माझा देश’ अभियानाला सुरुवात…’ BMCच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली ‘पंचप्राण’ शपथ

'माझी माती, माझा देश' अभियानाला सुरुवात...' BMCच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली 'पंचप्राण' शपथ

BreakingNews

खासगी बसवर सरकारचा डिजिटल ‘वॉच’; आता फिटनेसपासून ड्रायव्हरपर्यंत सर्वकाही ट्रॅक होणार!

गरीब महिलांच्या नशिबी पुन्हा धुराचे लोट; सिलिंडर उपलब्ध नसल्याने चुलीचाच आधार

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार

पॅन कार्ड प्रक्रियेत आता आधारसोबत मतदान कार्ड किंवा जन्म दाखला बंधनकारक – आयकर विभागाचा इशारा

ठाणेकरांच्या खिशाला कात्री! मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांनी ओलांडला शंभरीचा टप्पा

राज्यातील प्रत्येक शाळेत मासिक पाळीच्या काळात विश्रांतीसाठी ‘पिंक रूम’! विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.