Lokrakshanay
Monday, March 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह स्टेटस; दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी केली मारहाण

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 17, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह स्टेटस; दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी केली मारहाण
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून कार्यकर्त्यांना आदेश देत असताना कुणालाही मारहाण करताना व्हिडीओ काढू नका, असे सांगितले होते. मात्र विरारच्या घटनेनंतर आता विक्रोळीतही एका दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून मारहाण केली आहे. सदर दुकानदाराने व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी ही मारहाण करण्यात आली असून दुकानदाराची बाजारातून धिंडही काढण्यात आली.

विक्रोळीतील व्हिडीओ आता व्हायरल होत असून यावर टीका होऊ लागली आहे. सदर दुकानदार मारवाडी समाजातील असल्याचे सांगितले जात आहे. सदर दुकानदाराने व्हॉट्सॲपवर मराठी माणूस आणि महाराष्ट्राला उद्देशून आक्षेपार्ह स्टेटस ठेवले होते, असा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. आज सकाळी मनसे कार्यकर्ते सदर दुकानदाराच्या दुकानात गेले आणि त्यांनी व्हॉट्सॲप स्टेटसबद्दल जाब विचारून मारहाण केली. मनसेचे पदाधिकारी विश्वजीत ढोलम हे दुकानदाराला माफी मागायला लावून मारहाण करत असल्याचे आणि मार्केटमधून त्याची धिंड काढताना दिसत आहेत. या प्रकरणात अद्याप पोलिसांत तक्रार दाखल झालेली नाही. या प्रसंगानंतर माध्यमांशी बोलताना मनसेचे नेते अविनाश जाधव म्हणाले की, आम्हाला कुणालाही आमची ताकद दाखवायची नाही. पण जर कुणी महाराष्ट्रात येऊन इथे पैसे कमावत असेल आणि मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा जाणूनबुजून अपमान करत असेल तर त्याला धडा शिकवला जाईल.

Previous Post

चालत्या बस मधून फेकले नवजात बाळाला; बाळाचा मृत्यू, जोडप्याला अटक

Next Post

राज्यातील वीज वितरण व्यवस्था आणि सामान्य वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय!

Next Post
राज्यातील वीज वितरण व्यवस्था आणि सामान्य वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय!

राज्यातील वीज वितरण व्यवस्था आणि सामान्य वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय!

BreakingNews

माहिती अधिकाराचा गैरवापर करत गौरव स्वीट्सला लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून दोघांना बेड्या

बुलाती है मगर जाने का नहीं… ‘टिंडर’चा भयानक कांड

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.