Lokrakshanay
Sunday, April 12, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

एमएमआरडीएच्या महामार्ग जोडणीसाठी हालचाली

लवकरच नामांकित सल्लागार कंपन्यांना आमंत्रित करून त्यांच्याकडून याबाबतचा आराखडा तयार करून घेतला जाणार आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 24, 2023
in ठाणे, ताज्या बातम्या
एमएमआरडीएच्या महामार्ग जोडणीसाठी हालचाली
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाणे जिल्ह्यात विविध राज्यमार्ग आणि महामार्गाचे काम सुरू असले तरी यामध्ये संलग्नता नसल्याने शहरांतर्गत वाहतुकीवर त्याचा परिणाम होतो आहे. त्यामुळे हे मार्ग एकमेकांना जोडण्यासाठी वर्तुळाकार रस्त्यांची उभारणी करण्यासाठी एमएमआरडीएने हालचाली सुरू केल्या असून झालेल्या बैठकीत याबाबत सकारात्मक चर्चा झाली. लवकरच नामांकित सल्लागार कंपन्यांना आमंत्रित करून त्यांच्याकडून याबाबतचा आराखडा तयार करून घेतला जाणार आहे. विस्तारित ठाणे म्हणून ओळख असलेले कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि टिटवाळा ही शहरे विविध राज्यमार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गाने जोडलेले आहेत. मात्र या शहरांमधून बाहेर पडण्यासाठी शहरांतर्गत मोठा प्रवास करावा लागतो. हा प्रवास टाळून अवघ्या काही मिनिटात वाहन चालकाला महामार्गाला पोहचता यावे, यासाठी ही सर्व शहरे आणि महत्त्वाचे रस्ते वर्तुळ रस्त्यांनी जोडण्याची मागणी नुकत्याच झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. त्यावर एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ संजय मुखर्जी यांनीही सकारात्मक भूमिका घेत या नव्या मार्गाचे आखणीसाठी नामांकित सल्लागारांची बैठक आयोजित केली जाणार असल्याचे सांगितले. या सर्व शहरांमधून जाणारे मार्ग एकमेकांना जोडले गेल्यास अवघ्या काही मिनिटांत वाहन चालक शहराबाहेर पडू शकेल. सध्या शहरातून महामार्गांवर पोहोचण्यासाठी वाहन चालकाला मोठा वेळ खर्ची घालवा लागतो.

सोबतच मुंबई महानगर प्रदेशात गेल्या काही वर्षात नवनवीन राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग उभारणी सुरू आहे. या सर्व मार्गांसाठी संलग्नता करणे आवश्यक आहे. ही संलग्नता करण्यासाठी संपूर्ण महानगर प्रदेशाचा स्वतंत्र आराखडा तयार करण्याची गरज असून यासाठीही आता एमएमआरडीएने पुढाकार घेणार आहे. यासाठी महानगर प्रदेशातील सर्व महापालिकांच्या प्रमुखांना बोलावून त्या संदर्भात बैठक घेतली जाण्याची शक्यता आहे. याची अमलबजावणी झाल्यास मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार आहे. कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण या भागांना थेट नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईशी जोडणाऱ्या मेट्रो १२ च्या कामालाही लवकर सुरुवात होणार असून त्याची निविदा येथे दोन दिवसात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. मेट्रो १२ चे काम जलद गतीने सुरू असून या निवेदेनंतर मेट्रोच्या उभारणीतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे.

Previous Post

ठाण्यात एकावर वेळेत जेवण दिले नाही म्हणून केला कोयत्याने हल्ला

Next Post

जमीन खरेदी-विक्रीत एका व्यावसायिकाची नफ्याच्या आमिषाने सव्वा कोटींची फसवणूक

Next Post
४३ हजार रुपयांची एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याची फसवणूक, बीकेसी पोलिसांकडून तपास सुरू

जमीन खरेदी-विक्रीत एका व्यावसायिकाची नफ्याच्या आमिषाने सव्वा कोटींची फसवणूक

BreakingNews

कॉलेजमधील ‘ती’ भेट अन् १५ वर्षांचा विरह; ईशा-अभिषेकच्या फिल्मी लव्हस्टोरीचा गोड शेवट!

जिल्ह्यातील तरुणाईला बजेटचे धडे! ‘माय भारत’ उपक्रमांतर्गत थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी

शाळेतच भरली ‘विद्यार्थी बँक’! महापालिकेच्या उपक्रमातून चिमुरडे गिरवतायत बचतीचे धडे

बोरिवलीतील बीएसएनएल, एमटीएनएलच्या आरक्षित जागेवर आता परवडणाऱ्या ८००० घरांची गृहयोजना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय

“इराण असो वा नसो, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

राज्यात आता लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख अनिवार्य!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.