Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

विश्व मराठी संमेलनात मराठी भाषाप्रेमींना समाविष्ट करून घ्यावे – मंत्री दीपक केसरकर

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 12, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
विश्व मराठी संमेलनात मराठी भाषाप्रेमींना समाविष्ट करून घ्यावे – मंत्री दीपक केसरकर
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : ‘मराठी भाषेची वैश्विक व्याप्ती’ अशी मध्यवर्ती संकल्पना ठरवून येत्या २७ ते २९ जानेवारी या कालावधीत विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात महाराष्ट्र आणि देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावरून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या भाषा प्रेमींना जास्तीत जास्त संख्येने समाविष्ट करून घ्यावे, अशी सूचना मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केली. नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्र येथे आयोजित करण्यात येणाऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या पूर्वतयारीचा मंत्री श्री.केसरकर यांनी आढावा घेतला. यावेळी उपसचिव हर्षवर्धन जाधव, अवर सचिव नितीन डंगारे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ.शामकांत देवरे, भाषा संचालक विजया डोनीकर, साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मिनाक्षी पाटील आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले, महाराष्ट्रासह देशात आणि परदेशातही मराठी भाषा जपणारे नागरीक मोठ्या संख्येने आहेत. या सर्वांना एकत्र येऊन संवाद साधता यावा, त्यातून भाषेच्या संवर्धनासाठीची देवाण-घेवाण व्हावी, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उपक्रम राबविता यावेत या उद्देशाने विश्व मराठी संमेलन उपयोगी सिद्ध होणार आहे. यादृष्टीने बृहन्महाराष्ट्र मंडळे तसेच परदेशातील मराठी भाषेशी संबंधित संस्थांशी संपर्क साधण्यात यावा. महाराष्ट्रातील अधिकाधिक भाषा प्रेमी नागरिक संमेलनात सहभागी होतील यासाठी देखील प्रयत्न करण्यात यावेत. या संमेलनात साहित्यिक, मराठी भाषेच्या योगदानासाठी विविध पुरस्कार प्राप्त व्यक्ती, मराठीपण जपणारे राजघराणे आदींसह विविध माध्यमांचे संपादक, विविध क्षेत्रांतील मराठी उद्योजक आदींनाही निमंत्रित करण्यात यावे, अशी सूचना देखील मंत्री श्री.केसरकर यांनी केली.

Previous Post

‘अटल सेतू’ मुळे साधला जाणार मुंबई महानगर क्षेत्राचा सर्वांगीण विकास

Next Post

‘राष्ट्रवादी काँग्रेस’ शरद पवारांची की अजित पवारांची फैसला लवकरच होणार

Next Post
‘राष्ट्रवादी काँग्रेस’ शरद पवारांची की अजित पवारांची फैसला लवकरच होणार

‘राष्ट्रवादी काँग्रेस’ शरद पवारांची की अजित पवारांची फैसला लवकरच होणार

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.