Lokrakshanay
Wednesday, September 9, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

महसुली प्रकरणांच्या तडजोडीसाठी १ सप्टेंबरपासून ‘महात्मा फुले महसूल लोक अदालत’ अभियान

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 17, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
महसुली प्रकरणांच्या तडजोडीसाठी १ सप्टेंबरपासून ‘महात्मा फुले महसूल लोक अदालत’ अभियान
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : महसूल विभागातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली अर्धन्यायिक प्रकरणे परस्पर सहमती आणि तडजोडीने निकाली काढण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय महसूल विभागाने जारी केला आहे. या अभियानात मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), अपर जिल्हाधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या विविध प्रकारच्या महसुली दावे आणि अपिलांचा समावेश असेल.

प्रत्येक स्तरावर तीन महिन्यांतून एकदा महसूल लोक अदालत आयोजित करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. ज्या कार्यालयात किंवा अर्धन्यायिक न्यायालयात महसुली प्रकरण प्रलंबित आहे, तेथील दोन्ही पक्षकार स्वतः किंवा त्यांच्या वकिलामार्फत तडजोडीसाठी अर्ज करू शकतील. अर्जांची छाननी केल्यानंतर दोन्ही पक्षांची संमती निश्चित केली जाईल. त्यानंतर कायदेशीर तडजोडनामा तयार करून निश्चित केलेल्या लोक अदालतीच्या दिवशी दोन्ही पक्षांच्या सहमतीने अंतिम आदेश पारित केला जाईल. त्यामुळे संबंधित प्रकरण कायमस्वरूपी निकाली काढण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पक्षकारांना नोटीस देणे, अर्ज स्वीकारणे, छाननी, तडजोडनामा तयार करणे, पूर्वतयारी बैठक आणि प्रत्यक्ष लोक अदालत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र वेळापत्रक निश्चित केले जाणार आहे. जमिनीशी संबंधित महसुली प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने पक्षकारांचा वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. तसेच अपील व पुनरीक्षणामुळे प्रकरणे वर्षानुवर्षे सुरू राहतात. तडजोडीच्या माध्यमातून ही प्रकरणे निकाली निघाल्यास पक्षकारांचा वेळ व पैसा वाचण्याबरोबरच महसूल यंत्रणेवरील ताणही कमी होणार आहे. पुणे जिल्ह्यातील महसूल लोक अदालत उपक्रमाला मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर हे अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून अभियानाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. प्रलंबित प्रकरणातील पक्षकारांनी या संधीचा लाभ घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडे तडजोडीसाठी अर्ज करावा, असे आवाहन महसूल विभागाने केले आहे.

Previous Post

स्वयंपाकाच्या गॅसबाबत केंद्र सरकारचा नवा नियम; ग्राहकांना मोठा दिलासा! गॅस कंपन्यांना दणका

Next Post

सातारा जिल्‍ह्यात येणार नवे ९७ उद्योग

Next Post
सातारा जिल्‍ह्यात येणार नवे ९७ उद्योग

सातारा जिल्‍ह्यात येणार नवे ९७ उद्योग

BreakingNews

BEST बसमध्ये दिव्यांगांचा प्रवास आता १००% मोफत; महापालिकेकडून ७.६४ कोटींच्या अनुदानाला मंजुरी

“…तेव्हाच हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाईल”; इराणची अमेरिकेला थेट इशारा

आंतरराज्यीय आयफोन चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त; मुंबई पोलिसांकडून ४ आरोपींना अटक!

राजधानी दिल्ली हादरली! पाच मजली इमारत विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलवर कोसळली; ५० हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली?

Instagram वरही मुंढेंची क्रेझ; फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंना टाकले मागे!

‘बिग बॉस २०’ चा धमाका; ‘तथास्तु’ थीम आणि नव्या नियमांसह ५० लाखांसाठी रंगणार महासंग्राम!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.