Lokrakshanay
Friday, May 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home Uncategorized

महाराष्ट्र दहावी–बारावी परीक्षा कॉपीमुक्त! सीसीटीव्ही आणि ड्रोन नियंत्रण

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 12, 2026
in Uncategorized, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
महाराष्ट्र दहावी–बारावी परीक्षा कॉपीमुक्त! सीसीटीव्ही आणि ड्रोन नियंत्रण
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी आता सीसीटीव्ही आणि ड्रोन यंत्रणेद्वारे काटेकोर देखरेख ठेवण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. यासाठी राज्यस्तरीय दक्षता समिती स्थापन करण्यात आली असून, तिच्या नेतृत्वास शिक्षण आयुक्त नियुक्त आहेत. समितीत राज्य मंडळाचे अध्यक्ष, सर्व परीक्षेत्रांचे विशेष पोलीस महानिरीक्षक, विभागीय आयुक्त कार्यालयातील अतिरिक्त आयुक्त, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालक, योजना शिक्षण संचालक तसेच राज्य मंडळाचे सचिव यांचा समावेश आहे.

राज्यस्तरीय दक्षता समितीचे प्रमुख उद्दिष्ट दहावी व बारावीच्या परीक्षांचे वातावरण शांत, तणावमुक्त आणि गुणवत्तापूर्ण ठेवणे आहे. तसेच राज्यभरात ‘कॉपीमुक्त’ अभियान प्रभावीपणे राबवणे, परीक्षा केंद्रांमध्ये नियमबद्ध आणि काटेकोर सुरक्षा सुनिश्चित करणे याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली आहे. समिती सदस्यांना परीक्षा काळात केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन निरीक्षण करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. दक्षता समितीच्या नियमानुसार, परीक्षा केंद्रापासून ५०० मीटरच्या परिसरातील छायांकित प्रतीची दुकाने बंद ठेवणे, जिल्ह्यातील उपद्रवी व संवेदनशील केंद्रांची माहिती संकलित करणे, सर्व खोल्यांमध्ये सीसीटीव्ही बसवणे, उपद्रवी आणि संवेदनशील केंद्रांवर ड्रोन कॅमेराद्वारे सतत देखरेख ठेवणे, तसेच भरारी व बैठक पथके व पोलीस बंदोबस्त तैनात करणे यांसारख्या उपाययोजना केल्या जातील. या उपाययोजनांमुळे परीक्षेच्या दिवसांत विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे वातावरण सुरक्षित राहील आणि परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित होईल, असे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

 

Previous Post

यंदा मकर संक्रांतीला ‘या’ रंगाचे कपडे घालू शकत नाही?

Next Post

राज्यातील शाळांना सलग पाच दिवस सुट्टी?

Next Post
राज्यातील शाळांना सलग पाच दिवस सुट्टी?

राज्यातील शाळांना सलग पाच दिवस सुट्टी?

BreakingNews

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

७६ व्या वर्षीही फिटनेसचा जलवा; नाना पाटेकर यांचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

शेतकऱ्यांनो, सज्ज व्हा! आधारकार्डप्रमाणेच आता डिजिटल आयडी अनिवार्य

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.