Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये फेरफार केल्याचा आरोप; कीर्तिकर यांची मतमोजणीत गैरप्रकार झाल्याची तक्रार

या निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांना चार लाख ५२ हजार ६४४ मते मिळाली.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 13, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये फेरफार केल्याचा आरोप; कीर्तिकर यांची मतमोजणीत गैरप्रकार झाल्याची तक्रार
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : वायव्य मुंबई लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी मोठय़ा प्रमाणात गैरप्रकार व बेकायदा मार्गाचा वापर केला गेल्याची तक्रार शिवसनेच्या ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र तसेच व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये फेरफार केला गेला असण्याची शक्यता कीर्तिकर यांनी वर्तविली असून याबाबत तपासणी करण्याची मागणी आयोगाकडे केली आहे.

या निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांना चार लाख ५२ हजार ६४४ मते मिळाली. तर कीर्तिकर यांना चार लाख ५२ हजार ५९६ मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. दोघांमघ्ये फक्त ४८ मतांचा फरक आहे. या निवडणूक प्रक्रियेला आपण न्यायालयात आव्हान देणार आहोत. या पाश्र्वभूमीवर असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉम्र्स विरुद्ध इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, व्हीव्हीपॅट यंत्र निकाल लागल्यापासून किमान ४५ दिवसांपर्यंत सील करून ठेवणे बंधनकारक आहे. याशिवाय प्रत्येक विधानसभानिहाय किमान पाच टक्के इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातील कंट्रोल युनिट, व्हिव्हिपॅट यंत्राची मेमरी वा तत्सम यंत्रणेची संबंधित कंपनीच्या अभियंत्यांना बोलावून तपासणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार आपल्या मतदारसंघात तपासणी व्हावी, अशी मागणी कीर्तिकर यांनी केली आहे. या तपासणीच्या वेळी आपण किंवा आपला प्रतिनिधी जातीने हजर राहील, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने २६ एप्रिल २०२४ रोजी जारी केलेल्या आदेशाुसार, तांत्रिक मार्गदर्शक प्रणालीची प्रत आपल्याला उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.

 

Previous Post

पोलिसांसाठी अटलसेतूवर फक्त निवारा शेड, गस्ती वाहन नसल्याने गैरसोय

Next Post

निवड झालेल्या दोन उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल; बनावट प्रमाणपत्राच्या आधारे पोलीस भरतीचा प्रयत्न

Next Post
कामावरून काढून टाकल्याचा राग, कंपनीच्या व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला; चौघा हल्लेखोरांपैकी एकाला अटक

निवड झालेल्या दोन उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल; बनावट प्रमाणपत्राच्या आधारे पोलीस भरतीचा प्रयत्न

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.