Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

निवड झालेल्या दोन उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल; बनावट प्रमाणपत्राच्या आधारे पोलीस भरतीचा प्रयत्न

बीड येथून बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र बनवून त्याआधारे पोलीस भरतीत दोघांनी आरक्षण मिळविल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 13, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
कामावरून काढून टाकल्याचा राग, कंपनीच्या व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला; चौघा हल्लेखोरांपैकी एकाला अटक
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : बीड येथून बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र बनवून त्याआधारे पोलीस भरतीत दोघांनी आरक्षण मिळविल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ओम नगदे आणि आलम शेख यांच्याविरोधात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे दोघेही बीड जिल्ह्यातील आहेत. सुमारे वर्षभरापूर्वी असाच प्रकार उघडकीस आला होता. त्यावेळी सहा उमेदवारांविरोधात फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. ठाणे शहर पोलीस दलामध्ये २०२१ साली पोलीस शिपाई भरती जाहीर करण्यात आली. परंतू हि भरती २०२२ साली झाली. ५२१ पोलीस शिपाई पदांकरिता ही भरती प्रक्रिया पार पडली होती. यामध्ये पोलीस शिपाई पदांकरिता प्रकल्पग्रस्त म्हणून समांतर आरक्षणाच्या २७ जागा राखीव होत्या. ५२१ जागांसाठी राज्यभरातून ३९ हजार ३३८ अर्ज आले होते. त्यापैकी १ हजार ३८४ अर्ज प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी प्राप्त झाले होते. २०२३ मध्ये मैदानी चाचण्या आणि लेखी परिक्षा झाल्यानंतर उमेदवारांची अंतिम निवड यादी प्रकाशित झाली होती.

दरम्यान निवड झालेल्या प्रकल्पग्रस्त आणि भूकंपगस्त उमेदवारांच्या प्रमाणपत्रांच्या पडताळणीचे आदेश पोलीस महासंचलाकांनी दिले होते. निवड झालेल्या २७ प्रकल्पग्रस्त उमेदवारांपैकी १३ उमेदवारांकडे बीड या जिल्ह्यातील प्रमाणपत्र असल्याचे आढळून आले. यामध्ये ओम नगदे आणि आलम शेख यांचा समावेश होता. त्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी पोलीस उपनिरीक्षक आनंद राठोड यांच्याकडून सुरू होती. राठोड यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेत पडताळणी केली असता, ओम आणि आलम यांच्या नावाने कोणतेही प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले. संबंधित प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आल्याने ओम आणि आलम यांच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात शासनाच्या फसवणूकी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Previous Post

ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये फेरफार केल्याचा आरोप; कीर्तिकर यांची मतमोजणीत गैरप्रकार झाल्याची तक्रार

Next Post

राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी केंद्राकडून संपूर्ण सहकार्य – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

Next Post
राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी केंद्राकडून संपूर्ण सहकार्य – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी केंद्राकडून संपूर्ण सहकार्य – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.