Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

अखेर प्रतीक्षा संपली कारंजा बंदर मासळी बाजार झाला सुरू

मुंबईतील ब्रिटिशकालीन ससून व भाऊचा धक्का बंदरात उतरविण्यात येणारी मासळी आता करंजा येथे उरणच्या करंजा बंदरात खरेदी-विक्री सुरू करण्यात आली आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 16, 2024
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
अखेर प्रतीक्षा संपली कारंजा बंदर मासळी बाजार झाला सुरू
Share on FacebookShare on Whatsapp

उरण : मुंबईतील ब्रिटिशकालीन ससून व भाऊचा धक्का बंदरात उतरविण्यात येणारी मासळी आता करंजा येथे उरणच्या करंजा बंदरात खरेदी-विक्री सुरू करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनी उरणचे आ. महेश बालदी यांच्या हस्ते काट्याचे पूजन करून ही सुरुवात करण्यात आली. या वेळी स्थानिक मच्छीमारांनी आनंद व्यक्त केला. त्यामुळे ग्राहकांना घाऊक व स्वस्त मासळी मिळण्याचे मुंबईऐवजी नवीन ठिकाण उपलब्ध झाले आहे. मासळी खरेदी करायची असेल तर उरणच्या करंजा बंदरात या, असे आवाहन येथील मच्छीमार संस्था आणि मच्छीमारांनी केले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या १५० कोटी रुपयांच्या भागीदारीतून करंजा येथे एकाच वेळी ७५० मासेमारी बोटी उभ्या करून मासळीची खरेदी-विक्री करण्याची व्यवस्था असलेले करंजा बंदर सुरू झाले आहे.

नव्या हंगामामुळे नारळी पौर्णिमेनंतर मासेमारी करणाऱ्या बोटी दररोज येऊ लागतील. त्यामुळे या बंदरातील मासेमारी करणारा व्यावसायिक सध्या सुखावला आहे. बालदी यांनी करंजा बंदराच्या उर्वरित कामांसाठी १५४ कोटींचा निधी लवकरच मंजूर होईल आणि त्यानंतर बंदराचे काम पूर्ण करण्यात येईल. मात्र त्यापूर्वी मासळी खरेदी-विक्रीसाठी मत्स्यव्यवसाय विभागाद्वारे तात्पुरती व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. या बंदरामुळे अनेकांना रोजगार मिळणार आहे. भविष्यात करंजा हे बंदर करंजा-रेवस सागरी पुलामुळे मुंबईला सर्वात जवळचे बंदर ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील ससून डॉकमध्ये मासळीचा व्यवहार करणे जिकिरीचे झाले होते. त्या ठिकाणी वाढत्या गर्दीमुळे मासेमारांना दूरवरच्या कसारा बंदरात जाऊन मासळीची विक्री करावी लागत होती. आता ही सुविधा करंजा बंदरातच उपलब्ध झाल्याने रोजगार आणि मासळी विक्रीची सोय होणार आहे. – प्रदीप नाखवा, अध्यक्ष, करंजा मच्छीमार संस्था

करंजा बंदर सुरू झाले असून येथील तरुण मच्छीमार स्वत: मासळी निर्यात व्यवसाय करू लागला आहे. त्याचप्रमाणे या बंदरामुळे स्थानिकांना विविध प्रकारचे व्यवसायही उपलब्ध होणार आहेत. – गणेश नाखवा, युवा मच्छीमार नेते

Previous Post

डोंबिवली पूर्व येथील वाढलेल्या वाहनांच्या संख्येतून होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण

Next Post

डोंबिवलीत १६ वर्षीय तरुणीचे अपहरण

Next Post
कल्याणमध्ये बेकायदेशीररीत्या बांधलेल्या इमारतीतील घरं विकून १० जणांची फसवणूक

डोंबिवलीत १६ वर्षीय तरुणीचे अपहरण

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.