Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

डोंबिवलीत १६ वर्षीय तरुणीचे अपहरण

वाढदिवसासाठी सोमवारी संध्याकाळी घरातून बाहेर पडलेल्या डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवलीतील एका १६ वर्षाच्या मुलीचे अज्ञाताने अपहरण केले असल्याची तक्रार या मुलीच्या आईने विष्णुनगर पोलीस ठाण्यात केली आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 16, 2024
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या
कल्याणमध्ये बेकायदेशीररीत्या बांधलेल्या इमारतीतील घरं विकून १० जणांची फसवणूक
Share on FacebookShare on Whatsapp

डोंबिवली : वाढदिवसासाठी संध्याकाळी घरातून बाहेर पडलेल्या डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवलीतील एका १६ वर्षाच्या मुलीचे अज्ञाताने अपहरण केले असल्याची तक्रार या मुलीच्या आईने विष्णुनगर पोलीस ठाण्यात केली आहे. मुळ सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील असलेले हे कुटुंब नोकरीनिमित्त डोंबिवलीत राहत आहे. संध्याकाळी साडे सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान हा अपहरणाचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी सांगितले, अपहृत मुलीच्या मैत्रिणीचा वाढदिवस होता. संध्याकाळी मैत्रिणीने वाढदिवसानिमित्त घरी मेजवानी ठेवली होती. या कार्यक्रमासाठी अपहृत मुलगी जुनी डोंबिवलीतील भारत माता शाळेजवळील आपल्या घरातून संध्याकाळी साडे सहा वाजता निघाली. वाढदिवस असलेली तिची मैत्रिण सम्राट चौकात राहते. मुलगी वाढदिवस कार्यक्रमासाठी गेली आहे म्हणून अपहृत मुलीचे आई, वडील निश्चिंत होते.

रात्रीचे दहा वाजून गेले तरी मुलगी घरी येत नाही म्हणून अपहृत मुलीच्या आईने वाढदिवस असलेल्या मैत्रिणीला संपर्क केला. तेव्हा तिने तुमची मुलगी वाढदिवसासाठी आली नसल्याचे सांगितले. हे बोलणे ऐकून अपहृत मुलीच्या आई, वडिलांना धक्का बसला. त्यांनी मुलगी संध्याकाळी साडे सहा वाजता घरातून बाहेर पडली आहे, असे सांगितले. अपहृत मुलीच्या आई, वडील, वाढदिवस असलेल्या मैत्रिणीच्या कुटुंबीयांनी अपहृत मुलीचा डोंबिवली परिसरात तात्काळ शोध सुरू केला. ती उद्यान, बगिचा कोठे किंवा रेल्वे स्थानक भागातही आढळून आली नाही. त्यामुळे कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून आपल्या मुलीस पळून नेले असावे म्हणून अपहृत मुलीच्या आईने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी या अपहरण प्रकरणी तपास पथके तयार करून मुलीचा शोध सुरू केला आहे. जुनी डोंबिवली भागातील सीसीटीव्ही चित्रण तपासून, तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस अपहृत मुलीचा शोध घेत आहेत.

Previous Post

अखेर प्रतीक्षा संपली कारंजा बंदर मासळी बाजार झाला सुरू

Next Post

सरकारी जमिनीवर ८ हजार ५७३ बेकायदा बांधकामांवर कारवाई

Next Post
सरकारी जमिनीवर ८ हजार ५७३ बेकायदा बांधकामांवर कारवाई

सरकारी जमिनीवर ८ हजार ५७३ बेकायदा बांधकामांवर कारवाई

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.