महत्त्वाच्या घटना :
१९९९: पण्डित रविशंकर यांना ’भारतरत्न’
१९९७: महात्मा गांधीच्या अस्थींचे त्यांचे पणतू तुषार अरूण गांधी यांनी अलाहाबाद येथील संगमात विसर्जन केले. ४७ वर्षे या अस्थी कटकमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये होत्या.
१९९४: पीटर लेंको बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला.
१९३३: अॅडॉल्फ हिटलरचा जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष (चॅन्सेलर) म्हणून शपथविधी झाला.
१६४९: इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स याचा शिरच्छेद करण्यात आला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस :
१९७५: अनुप सोनी — भारतीय अभिनेता
१९६९: प्रदीप मनोहर पाटील — लेखक, कवी
१९६६: सुहास किर्लोस्कर — चित्रपट संगीताचे विविधांगी विश्लेषण करणारे लेखक
१९५९: निर्मिती सावंत — मराठी अभिनेत्री
१९५३: सुधीर कोर्टीकर — नाणे संग्रहाक, छायाचित्रकार, कवी, लेखक
१९५१: जयंत गुणे — लेखक, अनुवादक
१९४९: डॉ. सतीश आळेकर – प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते
१९४८: स्मिता राजवाडे — कादंबरी, कथा, ललित, काव्यसंग्रह, अनुवादित कवितासंग्रह, बालसाहित्य, नाटक अशी त्यांची १७ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.(मृत्यू: १८ जानेवारी २०२२ )
१९४५: सदानंद हरी डबीर — कवी, गीतकार, गझलकार
१९४३: भगवान माधवराव परसवाळे — कवी
१९३६: पं. दिनकर पणशीकर जयपूर अत्रोली घराण्याचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक(मृत्यू: ३ नोव्हेंबर २०२० )
१९३३: शांताराम राजेश्वर पोटदुखे — पत्रकार, माजी खासदार, माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा लेखक (मृत्यू: २३ सप्टेंबर २०१८ )
१९३०: सुनिता भास्कर देवधर — लेखिका
१९२९: रमेश देव – हिंदी, मराठी चित्रपटांतील व रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक(मृत्यू: २ फेब्रुवारी, २०२२ )
१९२७: प्राचार्य मोतीचंद्र गुलाबचंद शहा — लेखक
१९२७: ओलोफ पाल्मे – स्वीडनचे २६ वे पंतप्रधान (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९८६ )
१९१७: वामन दत्तात्रय पटवर्धन – स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ (मृत्यू: २७ जुलै २००७ )
१९११: पं. गजाननबुवा जोशी – शास्त्रीय गायक (मृत्यू: २८ जून १९८७ )
१९१०: सी. सुब्रम्हण्यम – गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल (मृत्यू: ७ नोव्हेंबर २००० )
१८९५: शंकरराव दत्तात्रय देव — विचारवंत, लेखक (मृत्यू: ३० डिसेंबर १९७५ )
१८९१: गोपाळ रामचंद्र परांजपे — विज्ञान लेखक (मृत्यू: ६ मार्च १९८१ )
१८८२: फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट – अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १२ एप्रिल १९४५ )
१८७४: बाळकृष्ण अनंत भिडे — मराठी इतिहासकार, कवी व समीक्षक (मृत्यू:२ मे १९२९)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन :
२०२३: नंदू घाणेकर — ज्येष्ठ संगीतकार व फिल्म मेकर (जन्म: ४ नोव्हेंबर १९५८ )
२०२०: विद्या बाळ — मराठी स्त्रीवादी लेखिका/संपादिका (जन्म: १२ जानेवारी १९३७ )
२००४: रमेश अणावकर — मराठी संगीतातील प्रसिद्ध गीतकार (जन्म: १७ सप्टेंबर १९३२)
२००१: वसंत शंकर कानेटकर — लोकप्रिय मराठी नाटककार,लेखक,कादंबरीकार आणि विचारवंत.(जन्म: २० मार्च १९२२ )
२०००: आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर – मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते
१९९६: गोविंदराव पटवर्धन – हार्मोनियम व ऑर्गन वादक
१९८८: बॅ.शेषराव कृष्णराव वानखेडे — क्रिकेट प्रशासक आणि माजी अर्थमंत्री (जन्म:२४ सप्टेंबर १९१४)
१९४८: काशीबाई कानिटकर — मराठी भाषेतील लेखिका व स्त्रीवादी समाजसुधारक होत्या.मराठी समाजात व स्थूलमानाने भारतीय समाजात स्त्रियांवर होणार्या अन्यायाविषयी त्यांनी आपल्या साहित्याद्वारे आवाज उठवला (जन्म: २० जानेवारी १८६१ )
१९४८: मोहनदास करमचंद गांधी- ’महात्मा’गांधी – राष्ट्रपिता (जन्म: २ ऑक्टोबर १८६९ )
१९४८: ऑर्व्हिल राईट – आपला भाऊ विल्बर राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते (जन्म: १९ ऑगस्ट १८७१ )

