Lokrakshanay
Saturday, May 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

अपर मुख्य प्रधान वनसंरक्षकांची माहिती; फ्लेमिंगाेंच्या मृत्यूची वनविभागाकडून चौकशी

या संपूर्ण घटनेचा तपास विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई कांदळवन विभागाचे सहायक वनसंरक्षक विक्रांत खाडे करीत असल्याचे रामाराव यांनी स्पष्ट केले आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 22, 2024
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
अपर मुख्य प्रधान वनसंरक्षकांची माहिती; फ्लेमिंगाेंच्या मृत्यूची वनविभागाकडून चौकशी
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : दुबईहून मुंबईत येत असलेल्या एमिरेट्सच्या विमानाला घाटकोपर येथे फ्लेमिंगोची धडक बसली. याप्रकरणी वनविभागाने तत्काळ चौकशी सुरू केली असल्याचे राज्याचे अपर मुख्य प्रधान वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांनी सांगितले. २० मे रोजी रात्री ८.४० वाजता घाटकोपर-अंधेरी लिंक रोड, लक्ष्मीनगर-पंतनगर भागात विमानाला धडकून फ्लेमिंगाे ३९ पक्षी मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत बहादुरे, त्यांचे सहकारी तत्काळ घटनास्थळी पाेहोचून पाहणी सुरू केली. त्यानंतर विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, मुंबई कांदळवन विभागाचे सहायक वनसंरक्षक विक्रांत खाडे हे कर्मचाऱ्यांना घेऊन अपघातस्थळाची पाहणी करून २९ मृतपक्षी ताब्यात घेतले. २१ मे रोजी सकाळी पुन्हा पाहणी केली असता आणखी १० मृत पक्षी सापडले. या सर्व मृत पक्ष्यांचे ऐरोलीतील वन विभागाच्या सागरी-किनारी जैवविविधता केंद्रात शवविच्छेदन करण्यात येत आहे.

या संपूर्ण घटनेचा तपास विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई कांदळवन विभागाचे सहायक वनसंरक्षक विक्रांत खाडे करीत असल्याचे रामाराव यांनी स्पष्ट केले आहे. नॅट कनेक्टच्या तक्रारीवर मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेली मॅन्ग्रोव्ह समिती २९ मे रोजी या तलावाची तपासणी करणार आहे, तर केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयानेही राज्य पर्यावरण विभागाला चौकशी करून अहवाल देण्यास सांगितल्याचे नॅट कनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले. सागर शक्तीचे नंदकुमार पवार यांनी उरण तालुक्यातील बेलपाडा, भेंडखळ आणि पाणजे पाणथळीच्या जागा सिडकोने पायाभूत सुविधांसाठी भाड्याने दिल्याने ती नष्ट होत असल्याचे सांगितले. पाणथळींच्या ठिकाणी फ्लेमिंगो येतात, असे पक्षीप्रेमी ज्योती नाडकर्णी म्हणाल्या. या पक्ष्यांचा त्यांच्या अधिवासावर हक्क आहे, ज्यापैकी मुंबईची खाडी एक महत्त्वाचा भाग आहे, असे खारघरचे कार्यकर्ते नरेशचंद्र सिंग यांनी सांगितले.

Previous Post

पंधरा हजार फुकट्या प्रवाशांना कोकण रेल्वेचा दणका

Next Post

मालमत्ता करापोटी पालिकेच्या तिजोरीत ४३२० कोटी जमा; पालिकेचा करदात्यांना इशारा

Next Post
बांधकामे रोखण्याचा आयुक्तांचा इशारा, उद्योग व व्यवसायांसाठी सूचना; बांधकामांबाबत पालिकेच्या सूचना

मालमत्ता करापोटी पालिकेच्या तिजोरीत ४३२० कोटी जमा; पालिकेचा करदात्यांना इशारा

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.