Lokrakshanay
Friday, July 3, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

जैन विद्यार्थ्यांसाठी राज्यातील सात ठिकाणी वसतिगृहे उभारणार!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 3, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
जैन विद्यार्थ्यांसाठी राज्यातील सात ठिकाणी वसतिगृहे उभारणार!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : जैन समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिक्षणासाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुंबई, नवी मुंबई, पुणेसह राज्यातील एकूण सात ठिकाणी वसतिगृहे उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाच्या संचालक मंडळाच्या चौथ्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. बैठकीत महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्ज व व्याज परतावा योजनांच्या सुधारित प्रारूपास मान्यता देण्यात आली. तसेच ‘विहारधाम निर्माण योजना’ आणि ‘पाठशाळा आधुनिकीकरण व सक्षमीकरण योजना’ प्रभावीपणे राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास व वित्त महामंडळाकडून अधिक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. राज्यभरातून प्राप्त झालेल्या मागण्यांचा विचार करून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी सात ठिकाणी वसतिगृहे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय ‘मराठी जैन साहित्य विश्वकोष’ निर्मितीसाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. जैन युवकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने कौशल्य प्रशिक्षण, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम तसेच इतर रोजगाराभिमुख योजनांचा लाभ मिळावा यासाठी विशेष अभियान राबविण्याचेही निश्चित करण्यात आले.

महिला व बाल विकास विभागाच्या सहकार्याने महिला बचत गटांसाठी विविध योजना अधिक प्रभावीपणे राबविणे, तसेच जैन समाजाचा शासनाच्या विविध योजनांमध्ये अधिकाधिक सहभाग वाढविणे यावरही बैठकीत भर देण्यात आला. समाजातील प्रमुख व्यक्तींपर्यंत योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचावी, या उद्देशाने मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार नवी दिल्ली येथे विशेष बैठक आयोजित करण्याबाबतही चर्चा झाली. दरम्यान, महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी पाठपुरावा करून जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी नवी दिल्ली येथे झालेल्या सामंजस्य करारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल त्यांचे बैठकीत विशेष कौतुक करण्यात आले. समन्वयक संदीप भंडारी यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला असून उपस्थित सर्व सदस्यांनी तो एकमताने मंजूर केला. बैठकीस अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिव माधवी खोडे-चवरे, व्यवस्थापकीय संचालक मेघना शिंदे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यक्रम व्यवस्थापक गौरी दोंदे, वित्त विभागाच्या कार्यासन अधिकारी रचना तळेकर, कौशल्य विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माळी, समन्वयक संदीप भंडारी तसेच महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील, सुनील पाटणी, विकास अच्छा, अमित जैन, दर्शना जैन, विश्वजीत कोल्हापुरे आणि प्रशांत गौडाजे उपस्थित होते.

Previous Post

जन्म-मृत्यू नोंदणीबाबत नवे निर्देश; २१ दिवसांत नोंदणी बंधनकारक!

Next Post

नवी मुंबईत मुसळधार पाऊस; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर!

Next Post
नवी मुंबईत मुसळधार पाऊस; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर!

नवी मुंबईत मुसळधार पाऊस; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर!

BreakingNews

नवी मुंबईत मुसळधार पाऊस; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर!

जैन विद्यार्थ्यांसाठी राज्यातील सात ठिकाणी वसतिगृहे उभारणार!

जन्म-मृत्यू नोंदणीबाबत नवे निर्देश; २१ दिवसांत नोंदणी बंधनकारक!

महागाईचा बाप्पावरही परिणाम; गणेशमूर्तींच्या किमतीत २५ ते ३० टक्क्यांची वाढ!

HSRP नंबरप्लेटसाठी आता मुदतवाढ नाही; नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू – प्रताप सरनाईक

‘पीओपी’ गणेशमूर्ती विसर्जनाबाबत गेल्या वर्षीचीच पद्धत कायम ठेवण्याची राज्य सरकारची उच्च न्यायालयात विनंती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.