Lokrakshanay
Monday, May 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

खासगी रुग्णालयांसाठी सरकारी करोना चाचणी केंद्रे खुली; पुणे महापालिकेचा मोठा निर्णय

राज्यात करोनाचा उपप्रकार जेएन.१ची रुग्णसंख्या वाढत आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या पुण्यात असून, महापालिकेने खासगी रुग्णालयांना संशयित रुग्णांची करोना चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 15, 2024
in ताज्या बातम्या, पुणे
खासगी रुग्णालयांसाठी सरकारी करोना चाचणी केंद्रे खुली; पुणे महापालिकेचा मोठा निर्णय
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : राज्यात करोनाचा उपप्रकार जेएन.१ ची रुग्णसंख्या वाढत आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या पुण्यात असून, महापालिकेने खासगी रुग्णालयांना संशयित रुग्णांची करोना चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, बाजारात रॅपिड अँटिजेन चाचणी किटचा तुटवडा निर्माण झाल्याने चाचणी कशी करायची, असा प्रश्न रुग्णालयांसमोर उपस्थित झाला होता. यातून मार्ग काढण्यासाठी आता महापालिकेच्या प्रयोगशाळांत खासगी रुग्णालयांना रुग्ण तपासणीसाठी पाठविण्यास सांगण्यात आले आहे. राज्यात जेएन.१ चे २५० रुग्ण असून, त्यातील सर्वाधिक १५० रुग्ण पुण्यात आहेत. पुण्यातील रुग्णसंख्या जास्त असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने उपाययोजना करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता असताना खासगी रुग्णालयांना केवळ सूचना करण्याचे काम सुरू होते. आरोग्य विभागाने रुग्णालयांना संशयित रुग्णांच्या रॅपिड अँटिजेन चाचण्या वाढविण्याची सूचना केली. मात्र, शहरात रॅपिड अँटिजेन चाचण्यांच्या किटचा तुटवडा असल्याने या चाचण्या करता येत नसल्याचे खासगी रुग्णालयांचे म्हणणे आहे.

किटचा तुटवडा असल्याने महापालिकेच्या प्रयोगशाळांत खासगी रुग्णालये त्यांचे रुग्ण करोना चाचणीसाठी पाठवू शकतात, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांसमोरील रुग्णांच्या करोना चाचणीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. महापालिकेकडून रुग्णालयांना चाचणी केंद्राची यादी पाठविण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली. महापालिकेने खासगी रुग्णालयांना रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्याचे निर्देश दिले. मात्र, या किटचा तुटवडा असल्याने चाचण्या करणे शक्य होत नव्हते. आता महापालिकेच्या चाचणी केंद्रामध्ये खासगी रुग्णालयांतील रुग्णांच्या चाचण्या होतील, असे हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे (पुणे शाखा) अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी सांगितले. दरम्यान, खासगी रुग्णालयांना संशयित रुग्णांच्या करोना चाचण्या करण्यासाठी पुरेशा प्रमाणात बाजारात किट उपलब्ध नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाने त्यांना महापालिकेच्या चाचणी केंद्रात रुग्णांच्या चाचण्या करण्यास सांगितले आहे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. भगवान पवार यांनी सांगितले.

Previous Post

जगाला हेवा वाटेल असा विकसित महाराष्ट्र घडविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

स्टेट बँकेच्या एटीएम मशिनमधून डोंबिवलीत २१ लाख रुपये जळून खाक

Next Post
स्टेट बँकेच्या एटीएम मशिनमधून डोंबिवलीत २१ लाख रुपये जळून खाक

स्टेट बँकेच्या एटीएम मशिनमधून डोंबिवलीत २१ लाख रुपये जळून खाक

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.