Lokrakshanay
Wednesday, July 22, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

ई-बस चालकांसाठी चार आठवड्यांचे प्रशिक्षण बंधनकारक! – बेस्टचा मोठा निर्णय

वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेला प्राधान्य; निष्काळजी चालकांवरही होणार कारवाई

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 4, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
ई-बस चालकांसाठी चार आठवड्यांचे प्रशिक्षण बंधनकारक! – बेस्टचा मोठा निर्णय
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : बेस्टच्या ताफ्यातील भाडेतत्त्वावरील विद्युत बसांच्या वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बेस्ट प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ई-बस चालकांसाठी आता चार आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण बंधनकारक करण्यात आले असून यापूर्वी हे प्रशिक्षण केवळ एका आठवड्यापुरते मर्यादित होते. गेल्या काही वर्षांत आर्थिक बचत आणि तोटा कमी करण्याच्या उद्देशाने बेस्टने मोठ्या प्रमाणात भाडेतत्त्वावरील बस ताफ्यात समाविष्ट केल्या आहेत. सध्या बेस्टच्या ताफ्यात एकूण २,७९२ बस असून त्यापैकी केवळ २४९ बस स्वमालकीच्या आहेत, तर २,५४४ बस भाडेतत्त्वावरील आहेत. या भाडेतत्त्वावरील बसांमध्ये १,२२५ सीएनजी आणि १,३१९ विद्युत बसांचा समावेश आहे. अलिकडच्या काळात ई-बसना आग लागणे आणि अपघात घडण्याच्या काही घटनांमुळे सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. विविध तपासण्यांमध्ये १० ते ११ बसांमध्ये तांत्रिक दोष आढळल्याने त्या तातडीने सेवेतून बाजूला काढण्यात आल्या होत्या.

बेस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नव्या प्रशिक्षणामध्ये तांत्रिक बाबी, सुरक्षित वाहनचालक पद्धती, आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन, शिस्तबद्ध संचालन तसेच ई-बसच्या कार्यप्रणालीची सखोल माहिती दिली जाणार आहे. याशिवाय बसची देखभाल आणि तपासणी प्रक्रियाही अधिक कठोर करण्यात आली आहे. मे महिन्यात कुर्ला, प्रतीक्षा नगर आणि सांताक्रूझ आगार येथे बसला आग लागण्याच्या चार घटना घडल्या होत्या. तसेच काही आगारांतील देखभाल व्यवस्थेतील त्रुटी आणि चालकांच्या वर्तनाबाबतही प्रश्न उपस्थित झाले होते. यामुळे बेस्ट समिती सदस्यांनी देखभालीवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्याबरोबरच निष्काळजीपणा करणाऱ्या चालकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेषतः भांडुप आणि कुर्ला येथे बस मागे जाण्याच्या घटनांनंतर प्रशिक्षण अधिक कठोर करण्यात आले आहे. उतार किंवा अरुंद रस्त्यांवर बस सुरक्षितपणे कशी हाताळावी, हँडब्रेकचा योग्य वापर कसा करावा आणि ई-बसमधील प्रगत ब्रेकिंग सिस्टीमची माहिती यावर विशेष भर दिला जाणार आहे. या निर्णयामुळे मुंबईतील बससेवा अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि प्रवाशांसाठी अधिक संरक्षित होईल, असा विश्वास बेस्ट प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Previous Post

नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांना विलंब; पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तक देण्यासाठी बालभारतीची धावपळ

Next Post

मुंबई-ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 4 आणि 4A च्या पहिल्या टप्प्याला लवकरच हिरवा कंदील

Next Post
मुंबई-ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 4 आणि 4A च्या पहिल्या टप्प्याला लवकरच हिरवा कंदील

मुंबई-ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 4 आणि 4A च्या पहिल्या टप्प्याला लवकरच हिरवा कंदील

BreakingNews

१५ ऑगस्टपासून पिंपरी-चिंचवडमध्ये कचरा विलगीकरण सक्तीचे!

अमेरिकेत शिक्षणाचे स्वप्न कठीण; परदेशी विद्यार्थ्यांसाठी व्हिसाला ‘४ वर्षांची’ कमाल मर्यादा!

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुर्मिळ आठवणींना उजाळा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छायाचित्र प्रदर्शनाचे दिमाखदार उद्घाटन

ठाणे जिल्ह्यात १५२ नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्रांना’ हिरवा कंदील!

इराण-अमेरिका वादामुळे भारताची धाकधूक; कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर टांगती तलवार!

थलपती विजयचा जलवा कायम! महागडी तिकिटे असूनही ‘जन नायकन’ हाऊसफुल

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.