Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी चार बांगलादेशी महिलांना गुन्हे शाखेच्या विभागाने घेतले ताब्यात

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई....बुधवार पेठेतील वेश्या वस्तीत बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी चार बांगलादेशी महिलांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ताब्यात घेतले. तर, अन्य पाच महिलांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव केल्याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 22, 2024
in ताज्या बातम्या, पुणे
बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी चार बांगलादेशी महिलांना गुन्हे शाखेच्या विभागाने घेतले ताब्यात
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : बुधवार पेठेतील वेश्या वस्तीत बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी चार बांगलादेशी महिलांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ताब्यात घेतले. तर, अन्य पाच महिलांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव केल्याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मासुका कलाम फकीर ऊर्फ शेख (वय २५), पिया नाझ्मुल सरदार ऊर्फ शेख (वय २७), रुजी हारून शेख (वय ३८), रूपा आकाश मंडोल (वय ४०, सध्या रा. बुधवार पेठ, मूळ, रा. बांगलादेश) अशी कारवाई केलेल्या महिलांची नावे आहेत. त्यांच्याकडे भारतातील वास्तव्याची अधिकृत कागदपत्रे चौकशीत आढळून आली नाहीत.

या चारजणी बुधवार पेठेतील कुंटणखान्यात मागील बारा वर्षांपासून राहत होत्या. याबाबत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातील पोलिस कर्मचारी तुषार भिवरकर यांना मिळाली होती. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने कुंटणखान्यात छापा टाकून नऊ महिलांना ताब्यात घेतले. बांगलादेशी महिलांविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात पारपत्र अधिनियम आणि परकीय नागरिक आदेश कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे आणि पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहाय्यक निरीक्षक राजेश माळेगावे, अनिकेत पोटे, सागर केकाण, अमेय रसाळ, इम्रान नदाफ, बाबा कर्पे, संदीप कोळगे, राजेंद्र कुमावत, मनिषा पुकाळे, रेश्मा कंक यांनी ही कारवाई केली.

Previous Post

ससूनमधील अतिदक्षता विभागात रुग्णाला उंदीर चावल्याने, वैद्यकीय अधीक्षकांची तडकाफडकी बदली

Next Post

नवी मुंबईतील फ्लेमिंगोच्या अदिवासावर घाला; पाणथळ जागेवर सिमेंटच्या इमारती उभ्या राहणार

Next Post
नवी मुंबईतील फ्लेमिंगोच्या अदिवासावर घाला; पाणथळ जागेवर सिमेंटच्या इमारती उभ्या राहणार

नवी मुंबईतील फ्लेमिंगोच्या अदिवासावर घाला; पाणथळ जागेवर सिमेंटच्या इमारती उभ्या राहणार

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.