Lokrakshanay
Saturday, July 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्प रविवारी होणार सादर

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 12, 2026
in ताज्या बातम्या, देश -विदेश, महाराष्ट्र
पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्प रविवारी होणार सादर
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्प हा रविवारी सादर केला जाणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दि. १२ जानेवारी ला केंद्रीय अर्थसंकल्प हा १ फेब्रुवारी रोजीच सादर होणार आहे अन् तो रविवारीच सादर होणार आहे असं सांगितलं. यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा निर्मला सीतारमण सादर करणार आहेत. त्या आपला आठवा अर्थसंकल्प संसदेच्या पटलावर ठेवणार आहेत. केंद्रीय संसदीय मंत्री किरण रिजीजू यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे वेळापत्रक गेल्या आठवड्यात जाहीर केलं. त्यांनी यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेश हे २८ जानेवारी आणि २ एप्रिल दरम्यान दोन सत्रात होणार आहे. याबाबतचा निर्णय रिजीजू यांनी सोशल मीडियावर शेअर केला. ते म्हणाले, ‘भारत सरकारच्या शिफरसीनुसार भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ साठी दोन्ही सभागृहांचे सत्र भरवण्याची परवानगी दिली आहे. हे सत्र २८ जानवारी रोजी सुरू होईल अन् २ एप्रिल रोजी संपुष्टात येईल.’ रिजीजू यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पहिले सत्र १३ फेब्रुवारी रोजी संपुष्टात येईल त्यानंतर दुसरे सत्र हे ९ मार्च रोजी सुरू होईल. केंद्रीय अर्थसंकल्प हा १ फेब्रुवारी रोजी म्हणजे रविवारी सादर होणार आहे. प्रत्येक वर्षीचे पहिले संसदीय संत्र हे अर्थसंकल्पीय सत्र असते. या संसदीय सत्राची सुरूवात ही राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होते. यावेळी राष्ट्रपती दोन्ही सभागृहांना एकत्रित संबोधित करत असतात. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर जुलै-ऑगस्ट महिन्यात पावसाळी अधिवेशन आणि नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशन होतं.

Previous Post

वर्षभरात मुंबई ‘बांगलादेशीमुक्त’ करणार! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

अमेरिकेला भारतीय कोळंबीची चटक! शुल्कात वाढ केल्यानंतरही निर्यातीत वाढ

Next Post
अमेरिकेला भारतीय कोळंबीची चटक! शुल्कात वाढ केल्यानंतरही निर्यातीत वाढ

अमेरिकेला भारतीय कोळंबीची चटक! शुल्कात वाढ केल्यानंतरही निर्यातीत वाढ

BreakingNews

हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; ७ डिसेंबरपासून नागपुरात रंगणार राजकीय रणसंग्राम!

‘शाळा बंद’ आंदोलन महागात; राज्यातील ८,६०० शिक्षकांचे वेतन कापणार!

तामिळनाडूत प्लास्टिक रिसायकलिंगला चालना; रिकामी प्लास्टिक बाटली दिल्यास मिळणार ५ रुपयांचा कॅशबॅक!

नवी मुंबई विमानतळ नामांतरण आंदोलन भोवले; २०० ते ३०० आंदोलकांवर पनवेल पोलिसांत गुन्हा!

‘सैराट २’ येणार का? नागराज मंजुळे यांची सिक्वेलबाबत स्पष्ट भूमिका

२० रुपयांच्या चोरीच्या आरोपामुळे ८वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; कुटुंबाचा शिक्षकांवर गंभीर आरोप!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.