Lokrakshanay
Sunday, November 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

RBI कडून एटीएम आणि कार्ड पेमेंटच्या नियमांत मोठे बदल; मोफत मर्यादेनंतर लागणार अतिरिक्त शुल्क

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 28, 2026
in ताज्या बातम्या
RBI कडून एटीएम आणि कार्ड पेमेंटच्या नियमांत मोठे बदल; मोफत मर्यादेनंतर लागणार अतिरिक्त शुल्क
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एटीएममधून रोख रक्कम काढणे, PoS टर्मिनलद्वारे कॅश विड्रॉल आणि कार्ड पेमेंटसंदर्भातील नियम एकत्रित करून नवीन मास्टर गाइडलाइन जारी केली आहे. हे नियम २७ नोव्हेंबर २०२६ पासून लागू झाले असून, ग्राहकांना अधिक पारदर्शक आणि सुरक्षित सेवा देण्यावर भर देण्यात आला आहे. नव्या नियमांनुसार, एटीएममधील मोफत व्यवहारांची मर्यादा पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे. ग्राहकांना स्वतःच्या बँकेच्या एटीएममधून दरमहा ५ मोफत व्यवहार करता येतील, तर इतर बँकांच्या एटीएममधून मेट्रो शहरांमध्ये ३ आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये ५ मोफत व्यवहार करता येतील. मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी बँका कमाल ₹२३ आणि लागू कर आकारू शकतील. मात्र, यासाठी बँकांना स्वतंत्र धोरण तयार करून ग्राहकांना व्यवहारांपूर्वी अलर्ट देणे बंधनकारक असेल. ग्राहकांनी महिन्यात किती मोफत व्यवहार वापरले आहेत आणि पुढील व्यवहारासाठी किती शुल्क लागू होईल, याची माहितीही बँकांना देावी लागणार आहे. एटीएम मेट्रो की नॉन-मेट्रो शहरात आहे, याची माहिती स्क्रीन, पोस्टर किंवा स्टिकरद्वारे दर्शविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तांत्रिक अडचणी, रोख रकमेचा अभाव, हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर बिघाड अथवा कम्युनिकेशन समस्येमुळे व्यवहार अयशस्वी झाल्यास ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही आणि अशा व्यवहारांची गणना मोफत व्यवहारांमध्येही केली जाणार नाही.

नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ग्राहकांना डेबिट कार्ड, पूर्ण KYC असलेले PPI आणि UPI च्या माध्यमातून निवडक व्यापारी आस्थापनांवरून रोख रक्कम काढण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे. एका व्यवहारात कमाल ₹२,०००, तर महिन्याला एकूण ₹१०,००० पर्यंत रोख रक्कम काढता येईल. या सुविधेसाठी आकारले जाणारे शुल्क व्यवहाराच्या रकमेच्या १ टक्क्यांपेक्षा जास्त असू शकणार नाही. विशेष म्हणजे, ही सुविधा वापरण्यासाठी ग्राहकांनी संबंधित दुकानातून खरेदी करणे आवश्यक राहणार नाही. कार्ड पेमेंटबाबतही RBI ने महत्त्वाचे बदल केले आहेत. ₹५,००० पर्यंतच्या कॉन्टॅक्टलेस व्यवहारांसाठी अतिरिक्त ऑथेंटिकेशनची आवश्यकता राहणार नाही, तर त्यापेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांसाठी पिन किंवा इतर प्रमाणीकरण आवश्यक असेल. ग्राहकांना कोणत्याही रकमेच्या व्यवहारासाठी स्वेच्छेने पिन वापरण्याचा पर्याय उपलब्ध राहील आणि बँका किंवा व्यापारी ग्राहकांना कॉन्टॅक्टलेस पेमेंट करण्यास भाग पाडू शकणार नाहीत. याशिवाय, बँकांना २४ तास कार्ड व्यवहार सुरू किंवा बंद करणे, व्यवहार मर्यादा बदलणे आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय व्यवहारांवरील नियंत्रण यांसारख्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण RBI इंटिग्रेटेड ओम्बड्समन स्कीम अंतर्गतच करण्यात येणार असून, या नव्या नियमांमुळे एटीएम आणि कार्ड व्यवहार अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

मुदत संपतेय! ९ वी व ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ₹१.२५ लाखांपर्यंत शिष्यवृत्तीची संधी

Next Post

स्वराज्याच्या गुप्तहेराची शौर्यगाथा आता रूपेरी पडद्यावर! बहुप्रतिक्षित ‘बहिर्जी’ चित्रपटाचं जबरदस्त मोशन पोस्टर रिलीज

Next Post
स्वराज्याच्या गुप्तहेराची शौर्यगाथा आता रूपेरी पडद्यावर! बहुप्रतिक्षित ‘बहिर्जी’ चित्रपटाचं जबरदस्त मोशन पोस्टर रिलीज

स्वराज्याच्या गुप्तहेराची शौर्यगाथा आता रूपेरी पडद्यावर! बहुप्रतिक्षित ‘बहिर्जी’ चित्रपटाचं जबरदस्त मोशन पोस्टर रिलीज

BreakingNews

स्वराज्याच्या गुप्तहेराची शौर्यगाथा आता रूपेरी पडद्यावर! बहुप्रतिक्षित ‘बहिर्जी’ चित्रपटाचं जबरदस्त मोशन पोस्टर रिलीज

RBI कडून एटीएम आणि कार्ड पेमेंटच्या नियमांत मोठे बदल; मोफत मर्यादेनंतर लागणार अतिरिक्त शुल्क

मुदत संपतेय! ९ वी व ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ₹१.२५ लाखांपर्यंत शिष्यवृत्तीची संधी

तुमच्या गाडीवरही वाहतूक दंड थकीत आहे? १ डिसेंबरपासून दंडावर मिळणार थेट २० टक्के सवलत!

ठाणे जिल्हा परिषदेत संविधान दिन उत्साहात; संविधान मूल्ये जपण्याचा संकल्प

तुम्हीही विकतचे पाणी पिताय? बिसलेरीच्या पाण्यात पुन्हा घातक जीवाणू आढळल्याने खळबळ; FSSAI कडून कारवाईचे आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.