Lokrakshanay
Thursday, June 25, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पाच किलो सोने अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलकडून जप्त

मेफेड्रोन विक्रीतून मिळालेल्या पैशांतून ललित पाटील, त्याचा भाऊ भूषण यांनी सोने, तसेच जमीन खरेदीत पैसे गुंतविल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 3, 2023
in ताज्या बातम्या, पुणे
पाच किलो सोने अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलकडून जप्त
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : मेफेड्रोन विक्रीतून मिळालेल्या पैशांतून ललित पाटील, त्याचा भाऊ भूषण यांनी सोने, तसेच जमीन खरेदीत पैसे गुंतविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ललितकडून पुणे पोलिसांनी पाच किलो सोने जप्त केले आहे. यापूर्वी ललितचा साथीदार भूषण याच्या नाशिक येथील घरातून तीन किलो सोने जप्त करण्यात आले होते.

अमली पदार्थ विक्री प्रकरणात ललितसह १४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात आतापर्यंत ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ललितचे साथीदार समाधान बाबाजी कांबळे (रा. नाशिक), इम्रान शेख उर्फ आमिर खान (रा. धारावी, मुंबई), हरिष पंत (रा. मुंबई) यांना अटक करायची आहे. ललितला चाकणमध्ये मेफेड्रोन बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर येरवडा कारागृहात ठेवण्यात आले. कारागृहातून तो उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल झाला होता. नाशिकमधील शिंदे गावात श्री गणेशाय इंडस्ट्रीज नावाने सुरू करण्यात आलेल्या कारखान्यात ललित आणि साथीदार मेफेड्रोन तयार करत होते. मेफेड्रोन निर्मिती, तसेच वितरणाची जबाबदारी आरोपींवर होती.

ललितला शिवाजीनगर न्यायालयाने ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिसांकडून ललिल, साथीदार शिवाजी शिंदे, राहुल पाठक यांची चौकशी पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. गुरुवारी (२ नोव्हेंबर) पुणे पोलिसांचे पथक ललित घेऊन नाशिकला तपासासाठी घेऊन गेले. ललितकडून पोलिसांनी पाच किलो सोने जप्त करण्यात आले. ललितसह साथीदारांविरुद्ध पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत.

Previous Post

मध्य रेल्वेचा पर्यटकांसाठी मोठा निर्णय; नेरळ-माथेरान मिनीट्रेन ४ नोव्हेंबरपासून सुरु होणार

Next Post

बनावट जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने आदेश काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Next Post
कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून रेल्वे प्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्यांना अटक

बनावट जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने आदेश काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल

BreakingNews

खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांसाठी ‘सर्वंकष अन्न सुरक्षा अनुपालन आदेश’; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश

उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवण्यासाठी भारतासमोर आज ‘करा किंवा मरा’चा सामना!

स्विगी डिलिव्हरी भागीदारांसाठी मोठी सुविधा; आता १०० रुपयांपासून करता येणार गुंतवणूक!

पुण्यात पनीरऐवजी ‘चीज अ‍ॅनालॉग’चा वापर; अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई, परवाने जप्त!

हॉटेल्समध्ये मिनरल वॉटरची सक्ती बंद! मोफत पिण्याचे पाणी देणे बंधनकारक – तुकाराम मुंढेंचे आदेश

महाराष्ट्राची डिजिटल झेप : नागरिकांसाठी अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान प्रशासनाकडे वाटचाल

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.