Lokrakshanay
Thursday, June 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

एल्फिस्टन रहिवासियांना लवकरच म्हाडाकडून मिळणार नव्या घराच्या चाव्या!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 8, 2026
in ताज्या बातम्या, मुंबई
एल्फिस्टन रहिवासियांना लवकरच म्हाडाकडून मिळणार नव्या घराच्या चाव्या!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : एल्फिस्टन वासियांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. एल्फिन्स्टन येथे सध्याचा पूल काढून वरळी- शिवडी कनेक्टरसाठी डबलडेकर पूल उभारला जाणार आहे. या पुलामुळे बाधित होणाऱ्या दोन इमारतींमधील रहिवाशांना लवकरच नव्या घराच्या चाव्या मिळणार असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

म्हाडा येत्या दोन दिवसांमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) घराचा ताबा देणार असून त्यादृष्टीने युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. त्यानंतर एमएमआरडीएकडून रहिवाशांना घरांचे वाटप करण्यात येणार आहे. एल्फिन्स्टन पुलाच्या कामामुळे येथील हाजी नुरानी आणि लक्ष्मी निवास या दोन इमारती बाधित होणार आहेत. लक्ष्मी निवास या इमारतीत ६०, तर हाजी नुरानी या इमारतीत एमएमआरडीएने रहिवाशांसाठी सुरुवातीला ८३ घरांची निवड केली होती. आता मात्र एमएमआरडीएने म्हाडाकडे केवळ ७८ घरांची मागणी केली आहे. रेडिरेकनरच्या ११० टक्के दर याप्रमाणे ७८ घरांपोटी ९० कोटी रुपये नववर्षाच्या सुरुवातीला एमएमआरडीएने म्हाडाच्या तिजोरीत जमा केले आहेत. पुढील दोन दिवसांत ही घरे एमएमआरडीएला सुपूर्द करण्यात येणार आहेत. या घरांच्या दुरुस्तीवर खर्च केलेले दीड कोटी रुपये मिळावेत, अशी मागणीही म्हाडाकडून करण्यात आली आहे. आमचे याच परिसरात पुनर्वसन करा, अशी रहिवाशांची मागणी होती. मात्र संबंधित रहिवाशांना दादर, माहीम, माटुंगा, वडाळा, प्रभादेवी, लोअर परळ या भागातील म्हाडाची घरे दिली जाणार आहेत.

 

Previous Post

पुणे रेल्वेचे सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठे पाऊल; ८ स्थानकावर बसवणार ‘पार्सल स्कॅनर’ मशिन

Next Post

मुंबईत बर्निंग थरार! विद्याविहार-कुर्ला दरम्यान लोकलला आग

Next Post
मुंबईत बर्निंग थरार! विद्याविहार-कुर्ला दरम्यान लोकलला आग

मुंबईत बर्निंग थरार! विद्याविहार-कुर्ला दरम्यान लोकलला आग

BreakingNews

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज!

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; लाभार्थी महिलांना दिलासा!

कल्याणमध्ये अधिक मासानिमित्त अनोखा उपक्रम; ३३ कष्टकरी महिला विक्रेत्यांचा साडी व मिठाई देऊन सन्मान!

पुण्यात नाट्यगृहांच्या आरक्षणातील मक्तेदारी संपणार; ऑनलाइन बुकिंग प्रणालीला गती!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.