Lokrakshanay
Monday, August 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी राजकीय पक्षांना केले मार्गदर्शन

राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे तसेच आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच निवडणूक खर्च करण्याचे केले आवाहन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 16, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी राजकीय पक्षांना केले मार्गदर्शन
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : आचारसंहिता लागू झाल्याने काय करावे, काय करु नये, नामनिर्देशनपत्र कसे भरावे, याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. सर्वांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच निवडणूक खर्च करावा, असे आवाहन त्यांनी आज येथे केले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री.अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, आचारसंहिता कक्ष प्रमुख तथा नोडल अधिकारी विजयसिंह देशमुख, उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, एमसीएमसी कमिटी सदस्य सचिव तथा नोडल अधिकारी (माध्यम कक्ष) मनोज शिवाजी सानप, खर्च नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी श्री.सत्यवान उबाळे, श्री.दिलीप सूर्यवंशी, श्री.वैजनाथ बुरुडकर, आचारसंहिता कक्ष सहायक नोडल अधिकारी सुकेशिनी पगारे, तहसिलदार सायली भगत, प्रदीप कुडाळ आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री.शिनगारे म्हणाले, भारत सरकारच्या पोर्टलवर याबाबत सर्व सविस्तर माहिती आहे. त्याचाही संदर्भ म्हणून वापर करावा. विशेषत: नामनिर्देशनपत्राबाबत आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी. वयस्कर तसेच दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा करण्यावर भर दिला आहे. राजकीय पक्षांनी बुथनिहाय प्रतिनिधी नेमावेत. सर्वांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे.
तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक 1950 :  लाच देणे, अवाजवी प्रभाव टाकणे, मतदारांना धाकदपटशा दाखविणे याबाबत काही तक्रारी असतील तर जिल्ह्याच्या तक्रार संनियंत्रण कक्षातील 1950 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी. हा कक्ष 24 तास सुरु आहे. राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाच्या विविध ॲप्सच्या सुविधांचा लाभ घ्यावा तसेच नागरिकांनाही या ॲप्सचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी केले. यानंतर उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आचारसंहिता कक्ष प्रमुख तथा नोडल अधिकारी विजयसिंह देशमुख यांनी आचारसंहितेत काय करावे, काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासह आचारसंहिता कक्ष सहायक नोडल अधिकारी सुकेशिनी पगारे उपस्थित होत्या.
यानंतर उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समिती सदस्य सचिव तथा नोडल अधिकारी (माध्यम कक्ष) मनोज शिवाजी सानप यांनी माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीअंतर्गत होणाऱ्या कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. यानंतर उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना निवडणूक संबंधीच्या खर्चाबाबत नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी श्री.सत्यवान उबाळे यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांच्यासह या बैठकीस, ठाणे महानगरपालिकेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी दिलीप सूर्यवंशी, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी वैजनाथ बुरडकर उपस्थित होते.

Previous Post

पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरात भ्रष्टाचारविरोधी जागरूकता अभियान !

Next Post

माथेरानच्या राणीची शीळ ४ महिन्यांनंतर गुंजणार; १ नोव्हेंबरला नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचा मुहूर्त ठरला

Next Post
माथेरानच्या राणीची शीळ ४ महिन्यांनंतर गुंजणार; १ नोव्हेंबरला नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचा मुहूर्त ठरला

माथेरानच्या राणीची शीळ ४ महिन्यांनंतर गुंजणार; १ नोव्हेंबरला नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचा मुहूर्त ठरला

BreakingNews

सातारा जिल्‍ह्यात येणार नवे ९७ उद्योग

महसुली प्रकरणांच्या तडजोडीसाठी १ सप्टेंबरपासून ‘महात्मा फुले महसूल लोक अदालत’ अभियान

स्वयंपाकाच्या गॅसबाबत केंद्र सरकारचा नवा नियम; ग्राहकांना मोठा दिलासा! गॅस कंपन्यांना दणका

पुण्यात ‘बर्गर किंग’सह १६ आस्थापनांना FDAचा दणका; किचनमधील अस्वच्छतेमुळे कारवाई

ठाण्यातील शतकमहोत्सवी ‘ऑफिसर्स क्लब’ला आधुनिकतेची झळाळी; स्वातंत्र्यदिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन!

रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळ! CSMT सह कल्याण, लोणावळा स्थानकांवरील पिण्याच्या पाण्यात ‘ई-कोलाय’ बॅक्टेरिया

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.