Lokrakshanay
Monday, March 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेजवरून झालेल्या वादाचे रूपांतर झाले हानामारीत

कल्याण पूर्वेतील आडीवली ढोकळी गावातील माणगंगा रेसिडेन्सी इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांच्या दोन गटात सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरील एका संदेशावरून जोरदार लिखित स्वरुपात बाचाबाची झाली.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 29, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
मद्यधुंद चालकाने वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करून केली मारहाण
Share on FacebookShare on Whatsapp

डोंबिवली : कल्याण पूर्वेतील आडीवली ढोकळी गावातील माणगंगा रेसिडेन्सी इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांच्या दोन गटात सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरील एका संदेशावरून जोरदार लिखित स्वरुपात बाचाबाची झाली. त्यानंतर हा विषय चव्हाट्यावर येऊन सोसायटीतील दोन गटात जोरदार राडा होऊन एकमेकांवर विनयभंगांचे गुन्हे मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केले आहेत. रात्री एक वाजताच्या दरम्यान हा प्रकार घडला. कल्याण पूर्वेत कोहीनूर इडन सोसायटी जवळील आडीवली ढोकळी गावातील माणगंगा रेसिडेन्सी या इमारतीत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणातील परस्पर विरोधी तक्रारीत ॲड. सुनीता सुनील पासी यांनी सोसायटीतील गोविंद राम, अल्पेश दातखिळे, राज नंदिनी, फुलकुमारी राम, आकाश साळवे, रेणु पाठक यांच्यासह १४ रहिवाशांच्या विरुध्द तक्रार केली आहे. याच सोसायटीतील मंतोरनीदेवी गिरीजाशंकर राम यांनी ॲड. सुनीता पासी, सुनील पासी, मनोज निसार, सोनू रजाक, योगेश बाविस्कर, पूनम बाविस्कर, बिपीन शर्मा, अनुराग तिवारी, आलोक नाईक यांच्या विरुध्द मारहाण, विनयभंगाची तक्रार केली आहे.

पोलिसांनी सांगितले, सोसायटीतील रहिवासी गोविंद राम याने सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एका संदेशावरून भांडण सुरू केले. तक्रारदार ॲड. सुनिता पासी यांनी यासंदर्भात राम यांना विचारणा केली. त्याचा राग येऊन राम यांच्यासह इतर आरोपींनी ॲड. पासी यांना शिवागीळ करत त्यांचा विनयभंग केला. तसेच सुनिता यांच्या पतीला मारहाण केली. याच सोसायटीतील मंतोरनदेवी राम यांनी ॲड. सुनिता पासी यांच्यासह इतरांविरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात गैरकायद्याची मंडळी जमवून आपणास मारहाण करत आपला विनयभंग केल्याची तक्रार केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद आरळेकर, पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Previous Post

महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांवर विनयभंगाप्रकरणी गुन्हा दाखल

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर गोळीबार; उपचारांदरम्यान मृत्यू

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर गोळीबार; उपचारांदरम्यान मृत्यू

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर गोळीबार; उपचारांदरम्यान मृत्यू

BreakingNews

माहिती अधिकाराचा गैरवापर करत गौरव स्वीट्सला लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून दोघांना बेड्या

बुलाती है मगर जाने का नहीं… ‘टिंडर’चा भयानक कांड

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.