वृत्तसंस्था : “मी राज्य सरकारने जाहीर केलेल्या ३१ हजार कोटी रुपये पॅकेजचे समर्थन करायला मी तयार आहे, पण माझी एक अट आहे”, असे सांगत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारकडे मोठी मागणी केली. सरकारने एक लाख रुपये दिवाळीपूर्वी एक लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, असे ठाकरे म्हणाले.
संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज हंबरडा मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. उद्धव ठाकरे म्हणाले, मी या पॅकेजचे समर्थन करायला तयार आहे. पण माझी एक अट आहे. मुख्यमंत्री बोललेत खरडून गेलेल्या जमिनीला पर हेक्टरी मनरेगातून साडेतीन लाख रुपये देणार आहोत. मग मी मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो की, तुमची नियत असेल तर दिवाळीआधी तीन लाखातील एक लाख रुपये माझ्या शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये जमा करा, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.