Lokrakshanay
Wednesday, April 22, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home राष्ट्रीय

सरकारचा मोठा निर्णय! आता महिला कर्मचाऱ्यांना मिळणार मासिक पाळीची भरपगारी सुट्टी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 11, 2025
in राष्ट्रीय
सरकारचा मोठा निर्णय! आता महिला कर्मचाऱ्यांना मिळणार मासिक पाळीची भरपगारी सुट्टी
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : महिलांच्या आरोग्याचा व कामाच्या ठिकाणी त्यांच्या सुसंवादाचा विचार करत कर्नाटक सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व महिला कर्मचाऱ्यांना आता मासिक पाळीच्या काळात दरमहा एक दिवसाची भरपगारी सुट्टी मिळणार आहे. या निर्णयामुळे कर्नाटक हे संपूर्ण भारतातील पहिले असे राज्य ठरले आहे,जिथे सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रांतील महिलांना मासिक पाळीची सुट्टी देण्यात आली आहे. महिलांना मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. कार्यालयीन कामकाजात सतत व्यस्त असणाऱ्या महिलांसाठी ही योजना मोठा दिलासा ठरणार आहे. या नव्या धोरणानुसार वर्षभरात महिलांना एकूण १२ भरपगारी सुट्ट्या मिळतील.

कर्नाटकचे राज्यमंत्री संतोष लाड यांनी या निर्णयाची घोषणा करताना सांगितले की, “महिलांच्या आरोग्याशी संबंधित गरजांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची ही वेळ आहे. महिलांसाठी सुसह्य व आदरयुक्त कामाचे वातावरण निर्माण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे.” या धोरणाचा लाभ केवळ सरकारी कर्मचाऱ्यांनाच नव्हे, तर कारखाने, आयटी कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्या, आणि इतर खाजगी क्षेत्रांतील महिला कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे स्वरूप सर्वसमावेशक ठरले आहे. यापूर्वी भारतातील काही राज्यांमध्ये मासिक पाळीच्या सुट्टीचे धोरण अस्तित्वात आहे, मात्र ती मर्यादित प्रमाणात आहे. या उपक्रमामुळे महिला कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या कामकाजातील कार्यक्षमता आणि समाधान वाढण्यास मदत होईल, असा तज्ञांचा अंदाज आहे. समाजातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे धोरण एक प्रेरणादायी आणि कौतुकास्पद पाऊल ठरत आहे.

Previous Post

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात १ लाख रुपये जमा करा, उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान

Next Post

वाघोलीत अफू विक्री करणारा गजाआड, २२ लाखांचा अफू जप्त

Next Post
वाघोलीत अफू विक्री करणारा गजाआड, २२ लाखांचा अफू जप्त

वाघोलीत अफू विक्री करणारा गजाआड, २२ लाखांचा अफू जप्त

BreakingNews

BESTची डिजिटल झेप; Google Pay, PhonePe सह २८ ॲप्सवरून तिकीट खरेदीची सुविधा

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.