Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

सिग्नलवर गजरे, वस्तू विकणाऱ्या मुलांसाठी ठाण्यात पहिली सिग्नल शाळा!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 15, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
सिग्नलवर गजरे, वस्तू विकणाऱ्या मुलांसाठी ठाण्यात पहिली सिग्नल शाळा!
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : शहरातील सिग्नलवर गजरे, फुले आणि अन्य वस्तू विकणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नेरुळमध्ये नवी मुंबई महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या पुढाकाराने पहिली सिग्नल शाळा सुरू करण्यात आली आहे. ठाण्याच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या या शाळेमुळे रस्त्यावरची मुले आता शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करू लागली आहेत. विशेष म्हणजे, या शाळेत ४५ विद्यार्थी सध्या शिक्षण घेत असून या विद्यार्थ्यांचे वर्ग महापालिकेच्या शाळेत भरवले जात असल्याची माहिती सिग्नल शाळेच्या व्यवस्थापकांनी दिली. समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महापालिकेने काही वर्षांपूर्वी ठाणे शहरातील तीन हात नाका जवळ सिग्नल शाळा सुरू केली होती. तीन हात नाका आणि आजूबाजूच्या परिसरातील शाळाबाह्य मुलांना या शाळेचा फायदा झाला. अनेक विद्यार्थी या शाळेतून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. आता, त्याच धर्तीवर समर्थ भारत व्यासपीठ यांनी नवी मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने नेरुळ येथे सिग्नल शाळा सुरू केली आहे.

जून २०२५ या शैक्षणिक वर्षापासून ही शाळा सुरू झाली आहे. सद्यस्थितीला या शाळेत ४५ विद्यार्थी शिक्षण घेत असून यात, २५ मुली आणि २० मुलांचा समावेश आहे. यामध्ये २७ बालावाडीचे विद्यार्थी आहेत. तर, पहिली ते चौथी इयत्तेत शिक्षण घेणारे दहा आणि पाचवी ते सहावी इयत्तेत शिक्षण घेणारे सात ते आठ विद्यार्थी आहेत. महापे सिग्नल, घणसोली स्थानक, तेरणा महाविद्यालय परिसरातील या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यापूर्वी त्यांच्या पालकांचे समुपदेशन करावे लागले. शाळेची बस दररोज या मुलांची ने-आण करते. दररोज शाळेत ८० टक्के विद्यार्थी येत आहेत. हे विद्यार्थी सोय नसल्याने अंघोळी शिवायच शाळेत येत असतात. अशावेळी संगोपक ज्या विद्यार्थ्यांनी अंघोळ केलेली नाही त्यांना अंघोळ घालून व्यवस्थित तयार करतात. मुलांना एकत्रित नाश्ता दिला जातो. मग शैक्षणिक वर्ग सुरू केले जातात. शैक्षणिक अभ्यासक्रमासह या मुलांना समाजात मोकळेपणाने वावरता यावे यासाठी या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर अधिक भर दिला जात आहे. या शाळेत आठवड्यातून एक दिवस मानसोपचार तज्ज्ञांना बोलावले जाते, अशी माहिती नेरुळ येथील सिग्नल शाळेचे प्रकल्प समन्वयक संतोष धुमक यांनी दिली.

Previous Post

शेतकऱ्यांनी आंबा, काजू व केळी या फळपिकांचा विमा उतरवावा – विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले

Next Post

‘महाभारत’मध्ये कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचे निधन

Next Post
‘महाभारत’मध्ये कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचे निधन

‘महाभारत’मध्ये कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचे निधन

BreakingNews

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६,७२८ कोटींचा निधी; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.