Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

पुण्यात गुन्हेगारी खटला सुरू” तीन दिवसांत तीन खून; गुलटेकडीत तरुणावर चाकूने वार करुन खून

हडपसरनंतर आता स्वारगेटमधील डायसप्लॉट परिसरात मोक्कातील गुन्हेगाराने जामीनावर बाहेर आल्यानंतर एका तरुणाचा जुन्या वादातून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 5, 2024
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या, पुणे
कल्याणमध्ये बेकायदेशीररीत्या बांधलेल्या इमारतीतील घरं विकून १० जणांची फसवणूक
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : टोळी युद्धातून माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खूनाची घटना घडल्यापासून शहरातील खूनाचे सुरूच राहिले आहे. हडपसरनंतर आता स्वारगेटमधील डायसप्लॉट परिसरात मोक्कातील गुन्हेगाराने जामीनावर बाहेर आल्यानंतर एका तरुणाचा जुन्या वादातून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याच्यावर चाकूने वार करून निर्घुन खून केला असून, या खुनाने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. सुनील सरोदे ‘वय २०, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी’ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी रोहन कांबळे, साहिल कांबळे, शिवशरण धेंडे यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. याप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, साहिल कांबळे याच्यावर महाराष्ट्र संघटित गु्न्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये ‘मोक्का’ कारवाई केली होती. मोक्का कारवाई केल्यानंतर साहिल नुकताच जामीन मिळवून बाहेर आला आहे. सरोदे हा डायस प्लॉट येथे राहायला आहे. त्याचा भाऊ आणि आरोपींची भांडणे झाली होती. पोलीसांकडून साहिलविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार होती. कारवाईपूर्वी त्याने डायस प्लॉट परिसरात मध्यरात्री दहशत माजविली.

आरोपी रोहन व साहिल हे साथीदारांसह सुनिल सरोदे याच्या भावाला मारण्यासाठी डायस प्लॉट परिसरात आले होते. सरोदेच्या भावाला ते मारत होते. त्यावेळी सरोदेने भावाला वाचविण्याचा प्रयत्न केला. सरोदेच्या मानेवर चाकूने वार करण्यात आला. मानेची नस तुटल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यावर पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली, अशी माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली. पुण्यात रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा निर्गुण खून करण्यात आला होता. सख्ख्या बहिणींनीच हा खून केल्याचे निष्पन्न देखील झाले होते. यातील काही आरोपींना अटक देखील करण्यात आली होती. मात्र या घटनेमध्ये आता आणखीन माहिती समोर आली असून ताम्हिणी घाटामध्ये लपून बसलेल्या १३ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सोमवारी या खूनप्रकरणी प्रकाश कोमकर, सोमनाथ गायकवाड आणि संजीवनी जयंत कोमकर यांना अटक केली होती. आता यामध्ये आणखी १३ जणांना ताब्यात घेण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी काही जण अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

Previous Post

डोंबिवलीतील रिजन्सी इस्टेटमधील क्लबहाऊसला लागली आग

Next Post

“२.५ वर्षात राज्यात ३.१४ लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक – -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस”

Next Post
“२.५ वर्षात राज्यात ३.१४ लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक – -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस”

"२.५ वर्षात राज्यात ३.१४ लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक - -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस"

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.