Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

“२.५ वर्षात राज्यात ३.१४ लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक – -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस”

एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीची आकडेवारी समोर आली असून देशात झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी तब्बल ५२.४६ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली असून राज्याने परकीय गुंतवणुकीत आपले अव्वल स्थान कायम राखले असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 6, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
“२.५ वर्षात राज्यात ३.१४ लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक – -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस”
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : देशातील एकूण परकीय गुंतवणुकीची एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीची आकडेवारी समोर आली असून देशात झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी तब्बल ५२.४६ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली असून राज्याने परकीय गुंतवणुकीत आपले अव्वल स्थान कायम राखले असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातील एकूण परकीय गुंतवणुकीबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यात २०१४ ते २०१९ या काळात सत्तेत असताना एकूण ३ लाख ६२ हजार १६१ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती. आता सव्वा दोन वर्षांत ३ लाख १४ हजार ३१८ कोटी रुपयांची गुंतवणूक शासनाने राज्यात आणली. दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी असल्याने एकूण गुंतवणुकीचा आकडा आणखी वाढणार आहे.

उद्योगस्नेही धोरणामुळे राज्य गेले दोन वर्षे सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक एकवर राहिले आहे. २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा राज्यात सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही १ लाख ३४ हजार ९५९ कोटी रुपये इतकी असून, त्यापैकी ७० हजार७९५ कोटी अर्थात ५२.४६ टक्के गुंतवणूक राज्यात आली आहे. कर्नाटक, दिल्ली, तेलंगणा, गुजरात, तामिळनाडू, हरयाणा, उत्तरप्रदेश व राजस्थान या राज्यांमध्ये झालेल्या गुंतवणुकीच्या एकत्रित बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. राज्यात २०२२-२०२३ मध्ये १ लाख १८ हजार ४२२ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली होती जी कर्नाटक, दिल्ली, गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक होती, २०२३-२४ मध्ये १ लाख २५ हजार १०१ कोटी रुपये गुंतवणूक राज्यात आली होती जी गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात व कर्नाटक यांच्या एकत्रित बेरजेहून अधिक होती. एप्रिल ते जून २०२४ या तिमाहीत राज्यांमध्ये झालेली गुंतवणूक, पहिला क्रमांक महाराष्ट्र (७०,७९५ कोटी), दुसरा कर्नाटक (१९,०९५ कोटी), तिसरा दिल्ली (१०,७८८ कोटी), चौथा तेलंगणा (९०२३ कोटी), पाचवा गुजरात (८५०८ कोटी), सहावा तामिळनाडू (८३२५ कोटी), सातवा हरियाणा (५८१८ कोटी), आठवा उत्तरप्रदेश (३७० कोटी), नववा राजस्थान (३११ कोटी) याप्रमाणे आहे.

Previous Post

पुण्यात गुन्हेगारी खटला सुरू” तीन दिवसांत तीन खून; गुलटेकडीत तरुणावर चाकूने वार करुन खून

Next Post

मुंबई व्यवस्थापकाचे आवाहन: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या योजनांसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करा

Next Post
मुंबई व्यवस्थापकाचे आवाहन: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या योजनांसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करा

मुंबई व्यवस्थापकाचे आवाहन: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या योजनांसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करा

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.