Lokrakshanay
Wednesday, June 24, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

विधानसभा अध्यक्षांनी दिले आदेश; मुंबईत अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी वाढल्या

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी झाल्याने मुंबई महापालिकेने शहरात दोन महिन्यांपूर्वी पाणीकपात जाहीर केली होती.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 4, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
विधानसभा अध्यक्षांनी दिले आदेश; मुंबईत अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी वाढल्या
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी झाल्याने मुंबई महापालिकेने शहरात दोन महिन्यांपूर्वी पाणीकपात जाहीर केली होती. संपूर्ण मुंबईत ३० मेपासून ५ टक्के तर ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. महानगरपालिकेतर्फे ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यातही ही कपात लागू करण्यात आली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. मुंबईत कमी दाबाने आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी वाढत असून मुंबईकर हैराण झाले आहेत. विधानसभेत आमदारांनी याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या दालनात शुक्रवारी तातडीची बैठक बोलावली आहे.

विधानसभेत आमदार आशिष शेलार यांनी वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रातील खार दांडा, गझदरबांध आणि वांद्रे परिसरातातील पाणी पुरवठ्याच्या तक्रारी मांडल्या. “मुंबई महापालिकेत सत्ताधारी असणाऱ्या उबाठा गटाने मुंबईकरांना २४ तास पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र दोन तास ही पाणी मिळत नाही. वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रात २४ तास पाणी पुरवठ्याचा पायलट प्रकल्प राबविण्यात आला. तो पूर्णपणे अपयशी ठरला. त्यामुळे आता एक तासभरसुद्धा पाणी मिळत नाही. त्यामुळे रहिवाशांमध्ये असंतोष आहे. तसेच मुंबईच्या सगळ्याच भागात याबाबत तक्रारी आहेत,” असे आशिष शेलार यांनी म्हटलं. आमदार आशिष शेलार यांनी मुंबईकरांच्या पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधल्यानंतर त्याला मुंबईतील अन्य आमदारांनी पाठींबा दिला. त्यामुळे याची गंभीर दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबई महापालिका जल अभियंत्यांनी तातडीने मुंबईतील पाणी पुरवठ्याची माहिती संबधित मंत्र्यांमार्फत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबत शुक्रवारी आमदार, महापालिका अधिकारी आणि संबंधित मंत्री यांची बैठक विधानभवनात आपल्या दालनात घेण्यात येईल, अशी घोषणा राहुल नार्वेकर यांनी केली.

Previous Post

महाराष्ट्र सरकार विधानसभेत करणार टी २० विश्वविजेत्या खेळाडूंचा जंगी सत्कार

Next Post

७ जुलै रोजी राज्यातील २२ केंद्रांवर लेखी परीक्षा

Next Post
७ जुलै रोजी राज्यातील २२ केंद्रांवर लेखी परीक्षा

७ जुलै रोजी राज्यातील २२ केंद्रांवर लेखी परीक्षा

BreakingNews

टेलिग्रामवरील तात्पुरती बंदी उठली!

माहितीचा अधिकार नियम २०२६ विरोधात अण्णा हजारे मैदानात!

बेस्टचा संप मिटला, मुंबईत बस सेवा पुन्हा सुरू!

चहाविक्रेत्याच्या सतर्कतेमुळे बनावट नोटांचा भांडाफोड; पुण्यात दोघांना अटक!

७०० रुपयांच्या पगारापासून लोकप्रियतेच्या शिखरापर्यंत; ‘बाघा’चा प्रेरणादायी प्रवास!

शिक्षण अधिकाऱ्यांना आता नियमित शाळा भेटी अनिवार्य; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.