Lokrakshanay
Wednesday, June 24, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

उल्हासनगर : व्यवसायातील गुंतवणुकीच्या माध्यमातून ३१ लाखाची फसवणूक

मागील दोन वर्षाच्या काळात हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 30, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
कल्याणमध्ये शेअर व्यवहारातून वृद्धांची १९ लाखांची फसवणूक
Share on FacebookShare on Whatsapp

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील एका उद्योजक महिला आणि इतर गुंतवणूकदारांची उल्हासनगर मधील पती, पत्नीने व्यवसायातील गुंतवणुकीच्या माध्यमातून ३१ लाख ५८ हजार ४८० रूपयांची फसवणूक केली आहे. मागील दोन वर्षाच्या काळात हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात फसवणूक झालेल्या महिलेने याप्रकरणी तक्रार केली आहे. रश्मी संदीप संत असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या डोंबिवली एमआयडीसीतील मिलापनगर भागात राहतात. त्या उद्योजक आहेत. विजय मुकुंद परब, दर्शना विजय परब असे फसवणूक करणाऱ्या पती, पत्नीचे नाव आहे. हे दाम्पत्य उल्हासनगर मधील व्हिनस सिनेमा समोरील गजानन नगर मधील भक्ती निवासमध्ये राहते. ते मुळचे कणकवली येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी सांगितले, तक्रारदार रश्मी संत आणि आरोपी दर्शना व विजय परब यांची व्यापार व्यावसायिकतेच्या माध्यमातून ओळख झाली होती. आरोपी परब दाम्पत्याने रश्मी संत यांना आमच्या दर्शना एन्टरप्रायझेस या कंपनीत तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला अल्पकाळात आकर्षक मोबदला आम्ही देऊ. कमी कालावधीत जास्त परतावा मिळत असल्याने रश्मी आणि त्यांच्या परिचित इतर गुंतवणूकदारांनी विजय यांनी सांगितल्या प्रमाणे टप्प्याने आपल्या बँक खात्यामधून एक कोटी तीन लाख २४ हजार रूपये विजय यांच्या बँक खात्यात जमा केले.

या गुंतवणूक रकमेवर सुरूवातीच्या काळात परब दाम्पत्याने गुंतवणुकीच्या ठरल्या कराराप्रमाणे रश्मी आणि इतर गुंतवणूकदार यांना ७१ लाख ६५ हजार ५२० रूपयांचा आकर्षक परतावा दिला. उर्वरित रक्कम परताव्यासह परत करण्याची मागणी रश्मी आणि इतर गुंतवणूकदार यांनी परब दाम्पत्याकडे सुरू केली. त्यावेळी खोटी कारणे देऊन, वेळकाढूपणा करून ते पैसे परत करण्यास टाळाटाळ करत होते. दोन वर्ष उलटले तरी परब दाम्पत्य आपले पैसे परत करत नाहीत. ते आपले पैसे परत करण्याची शक्यता नसल्याने त्यांनी आपला पैसा स्वार्थासाठी वापरून आपल्या रकमेचा अपहार केला म्हणून रश्मी संत आणि इतर साक्षीदारांंनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी परब दाम्पत्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे तपास करत आहेत.

Previous Post

टिटवाळ्यात बेकायदा चाळींची उभारणी, भूमाफिया विरुध्द गुन्हा दाखल

Next Post

प्रशासनाला नागरिकांचा इशारा; घंटा गाडीला प्रवेश नाही

Next Post
प्रशासनाला नागरिकांचा इशारा; घंटा गाडीला प्रवेश नाही

प्रशासनाला नागरिकांचा इशारा; घंटा गाडीला प्रवेश नाही

BreakingNews

टेलिग्रामवरील तात्पुरती बंदी उठली!

माहितीचा अधिकार नियम २०२६ विरोधात अण्णा हजारे मैदानात!

बेस्टचा संप मिटला, मुंबईत बस सेवा पुन्हा सुरू!

चहाविक्रेत्याच्या सतर्कतेमुळे बनावट नोटांचा भांडाफोड; पुण्यात दोघांना अटक!

७०० रुपयांच्या पगारापासून लोकप्रियतेच्या शिखरापर्यंत; ‘बाघा’चा प्रेरणादायी प्रवास!

शिक्षण अधिकाऱ्यांना आता नियमित शाळा भेटी अनिवार्य; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.