Lokrakshanay
Sunday, April 12, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home Uncategorized

मुंबई-पुण्यात कॉल सेंटरवर सीबीआयचे छापे, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 26, 2025
in Uncategorized, गुन्हेगारी, पुणे, मुंबई
मुंबई-पुण्यात कॉल सेंटरवर सीबीआयचे छापे, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) पुणे, मुंबईतील कॉल सेंटरवर छापा टाकून तिघांना अटक करण्यात आली. या प्रकरणात एका बँक अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एकूण चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांना ‘सीबीआय’ने मुंबईतील विशेष न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

‘सीबीआय’ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, पुणे, मुंबईतील कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करण्यात येत असल्याची माहिती ‘सीबीआय’च्या मुंबई कार्यालयाला मिळाली होती. फसवणुकीतून मिळालेली रक्कम बनावट बँक खात्यात वळविण्यात आली होती. संबंधित बँक अधिकारी व आरोपींनी संगनमत करून बनावट कागदपत्रांद्वारे बँक खाते उघडल्याची माहिती मिळाली होती. काही रक्कम हवालामार्फत हस्तांतरित केली जायची. दरमहा साधारणपणे तीन ते चार कोटी रुपयांची फसवणूक केली जात होती. याबाबतची माहिती ‘सीबीआय’च्या पथकाला मिळाली. त्यानुसार, कॉल सेंटरचालकासह कर्मचाऱ्यांच्या सदनिकांवर छापे टाकून रोकड जप्त करण्यात आली. कॉल ल सेंटरमधील एका कर्मचाऱ्याच्या सदनिकेतून अमली पदार्थही जप्त करण्यात आले. या कारवाईत ‘सीबीआय’च्या पथकाने २७ मोबाइल संच, १७ लॅपटॉप, आभासी चलन, रोकड असा मुद्देमाल जप्त केला.

‘सीबीआय’च्या पथकाने सात ठिकाणी कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना मुंबईतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपींनी फसणूक करण्यासाठी समाजमाध्यमातील संपर्क यंत्रणेचा वापर केल्याचे उघडकीस आले आहे. आभासी चलनात गुंतणूक, तसेच गिफ्ट कार्डच्या आमिषाने आरोपींनी फसवणूक केली. बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून आरोपी दरमहा तीन ते चार कोटी रुपये मिळवित होते. फसवणुकीतून मिळालेली रक्कम आरोपी बनावट नावाने उघडलेल्या बँक खात्यांत हस्तांतरित करायचे. आरोपींना काही रक्कम हवालाच्या माध्यमातून मिळाली होती. आरोपींकडून दहा लाख २० हजार, तसेच सहा लाख ९४ हजार रुपये मूल्य असलेले आभासी चलन, १५० ग्रॅम अमली पदार्थ, लॅपटॉप, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Previous Post

मुंबईत पहाटेपासून पावसाने धरला जोर; २-३ दिवस पाऊस सक्रिय, हवामान विभागाचा अंदाज

Next Post

ठाण्यात डेंग्यूसह मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ, पालिकेकडून काळजी घेण्याचे आवाहन

Next Post
ठाण्यात डेंग्यूसह मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ, पालिकेकडून काळजी घेण्याचे आवाहन

ठाण्यात डेंग्यूसह मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ, पालिकेकडून काळजी घेण्याचे आवाहन

BreakingNews

कॉलेजमधील ‘ती’ भेट अन् १५ वर्षांचा विरह; ईशा-अभिषेकच्या फिल्मी लव्हस्टोरीचा गोड शेवट!

जिल्ह्यातील तरुणाईला बजेटचे धडे! ‘माय भारत’ उपक्रमांतर्गत थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी

शाळेतच भरली ‘विद्यार्थी बँक’! महापालिकेच्या उपक्रमातून चिमुरडे गिरवतायत बचतीचे धडे

बोरिवलीतील बीएसएनएल, एमटीएनएलच्या आरक्षित जागेवर आता परवडणाऱ्या ८००० घरांची गृहयोजना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय

“इराण असो वा नसो, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

राज्यात आता लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख अनिवार्य!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.