Lokrakshanay
Friday, April 3, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

सावधान! बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल घेण्यावर बंदी; नियम मोडल्यास थेट जेलची हवा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 28, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या
सावधान! बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल घेण्यावर बंदी; नियम मोडल्यास थेट जेलची हवा
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा समाजमाध्यमांवर पसरत असताना ठाणे जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि ज्वलनशील पदार्थांच्या गैरवापरामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी बाटल्या, कॅन किंवा इतर भांड्यांमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे.

ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पेट्रोलियम नियम २००२ अंतर्गत हा आदेश जारी केला असून, जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर इंधन केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही ग्राहकाला प्लास्टिकच्या बाटल्या, कॅन, डबे किंवा इतर कोणत्याही भांड्यांमध्ये सुटे पेट्रोल अथवा डिझेल विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. पश्चिम आशियातील देशांमध्ये सुरू असलेल्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधन साठ्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीचा परिणाम ठाणे जिल्ह्यातही दिसून येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वाहनचालक मोठ्या प्रमाणावर आपल्या वाहनांमध्ये इंधन भरून ठेवण्यासाठी पेट्रोल आणि सीएनजी पंपांकडे धाव घेत असल्याचे चित्र दिसत आहे. यामध्ये अनेक नागरिक काही लहान कॅन मध्ये देखील अतिरिक्त इंधनाची मागणी देखील करत आहे. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी चुकीच्या पद्धतीने इंधनाची विक्री करण्यावर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार, सर्व पेट्रोल पंप चालकांनी सुरक्षेच्या दृष्टीने पंप परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा चोवीस तास कार्यरत ठेवणे, तसेच इंधन विक्रीच्या नोंदी नियमित ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित पेट्रोल पंप मालक आणि व्यवस्थापकांवर असणार आहे. हा आदेश २७ मार्च २०२६ पासून तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून पुढील आदेश मिळेपर्यंत तो लागू राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध पेट्रोलियम नियम २००२, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Previous Post

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! पेट्रोल-डिझेलच्या दरात १० रुपयांची ऐतिहासिक कपात

Next Post

उद्योग क्षेत्रातील ध्रुवतारा अनंतात विलीन! डॉ. विजयपत सिंघानिया यांनी घेतला अखेरचा श्वास; हवाई दलाची मानवंदना

Next Post
उद्योग क्षेत्रातील ध्रुवतारा अनंतात विलीन! डॉ. विजयपत सिंघानिया यांनी घेतला अखेरचा श्वास; हवाई दलाची मानवंदना

उद्योग क्षेत्रातील ध्रुवतारा अनंतात विलीन! डॉ. विजयपत सिंघानिया यांनी घेतला अखेरचा श्वास; हवाई दलाची मानवंदना

BreakingNews

पाळीच्या दिवसातही विद्यार्थिनींना मिळणार हक्काचा आराम; शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिनसह ‘पिंक रूम’ सज्ज

ना पाकिस्तान, ना लियारी! धुरंधरचं शूट पाकिस्तानात नाही तर चक्क बँकॉकला?

स्टंटमॅनच्या मुलानं इतिहास रचला; अजय देवगणचा थक्क करणारा प्रवास!

महिलांना महिना ₹२५०० सह २ गॅस सिलिंडर मोफत मिळणार – भाजपची मोठी घोषणा!

“तुम्ही लढा, स्वतःचे रक्षण स्वतःच करा!” – इंधन टंचाईवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा मित्रदेशांना इशारा

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! आता गुणपत्रक आणि प्रमाणपत्र मिळणार एकत्रित; नावाचा घोळही मिटणार

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.