Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

दोन्ही शिवसेना गटांचे दसरा मेळाव्यात शक्तिप्रदर्शन

शिवसेना फुटीनंतर होणाऱ्या दुसऱ्या दसरा मेळाव्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या शिवसेनेच्या दोन्ही गटांनी कंबर कसली आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 23, 2023
in ताज्या बातम्या, मुंबई
दोन्ही शिवसेना गटांचे दसरा मेळाव्यात शक्तिप्रदर्शन

Shiv Sena president Uddhav Thackeray and Chief Minister Eknath Shinde address separate Dussehra rallies in Mumbai | PTI

Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : शिवसेना फुटीनंतर होणाऱ्या दुसऱ्या दसरा मेळाव्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या शिवसेनेच्या दोन्ही गटांनी कंबर कसली आहे. दोन्ही गटांच्या मेळाव्यासाठी एक लाखापेक्षा जास्त शिवसैनिक उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दोन्ही गट या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करणार आहेत. ठाकरे गटाचा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा मुंबई महापालिकेसमोरील आझाद मैदानावर होणार आहे. ठाकरे गटाने या मेळाव्याचे दोन टीझर प्रदर्शित केले असून त्यात शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली आहे. दोन्ही गटांनी मुंबईत ठिकठिकाणी फलकबाजी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत.

शिवसैनिकांसाठी दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हे गेली ५६ वर्ष तयार झालेले समीकरण आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी शिवाजी पार्क येथे जमत होती. १६ महिन्यापूर्वी शिवसेनेत फूट पडून ठाकरे व शिंदे असे दोन गट तयार झाले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या दसऱ्या मेळाव्याच्या शिवाजी पार्क मैदानावरुन दोन्ही गटात रणकंदन माजले होते. अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदान मुंबई पालिकेला देणे भाग पडले. त्यामुळे शिंदे गटाला हा मेळावा वांद्रे येथील बीकेसी मैदानावर घ्यावा लागला होता. गेल्या वर्षीची तणावपूर्व स्थिती यंदाही निर्माण झाली होती. मात्र शिंदे गटाने शिवाजी पार्क वरील आपला दावा मागे घेतल्याने ठाकरे गटाचा मार्ग सुकर झाला असून या मेळाव्याची आठवडाभर जय्यत तयारी सुरु आहे. त्याचवेळी शिंदे गटानेही आझाद मैदान येथे मेळावा घेण्याची तयारी पूर्ण केली आहे. या दोन्ही मेळाव्यांसाठी राज्यातून दोन ते अडीच लाख शिवसैनिक मुंबईत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांवरील ताण वाढला असून वाहतुकीचे नियोजन केले जात आहे. उध्दव ठाकरे हे राज्यातील दुष्काळ, बेरोजगारी, हिंदूत्व, मराठा आरक्षण,परदेश दौरे, भ्रष्टाचार या विषयांवर शिंदे गटावर तोफ डागणार आहेत तर शिंदे गटाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्र व राज्य सरकारची कामगिरी, पूर्ण केलेले प्रकल्प व योजना, दुष्काळावरील उपाययोजना, सरकार आपल्या दारी सारख्या उपक्रमांची माहिती या निमित्ताने देणार आहेत.

ठाकरे गटाकडून या मेळाव्याचे दोन टीझर प्रदर्शित झाले आहेत.गर्दी तीच,जल्लोष तोच,मैदान तेच म्हणत एकनिष्ट शिवसैनिकांच्या या मेळाव्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. दुसऱ्या टीझरमध्ये दसरा मेळावा हा मर्दाचा मेळावा असल्याचे सांगत शिंदे गटाला गद्दार, खोक्यांचे सरकार अशा शब्दात हिणविण्यात आले आहे.

Previous Post

ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीला विशेष अनुदान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

Next Post

पुण्यात ११ लाखांचा दंड वसुली; एकाच दिवसात हजारहून अधिक फुकट्या प्रवाशांना दणका

Next Post
पुण्यात ११ लाखांचा दंड वसुली; एकाच दिवसात हजारहून अधिक फुकट्या प्रवाशांना दणका

पुण्यात ११ लाखांचा दंड वसुली; एकाच दिवसात हजारहून अधिक फुकट्या प्रवाशांना दणका

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.