Lokrakshanay
Friday, April 3, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय! ड्युटीपूर्वी चालक-वाहकांची अल्कोटेस्ट तपासणी बंधनकारक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
March 5, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय! ड्युटीपूर्वी चालक-वाहकांची अल्कोटेस्ट तपासणी बंधनकारक
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) सेवेत असताना मद्यपानास आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी कठोर उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार आगारात कामावर हजर होणाऱ्या सर्व चालकांची अल्कोटेस्ट मशीनद्वारे दररोज मद्यपान तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले असून, योग्य नोंदी घेऊनच चालकांना कर्तव्यावर पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. २५ जानेवारी रोजी मंत्री सरनाईक यांनी मुंबईतील परळ बसस्थानकाला अचानक भेट दिली. यावेळी चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांमध्ये अनेक मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. तसेच काही कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही निदर्शनास आले.

या धक्कादायक प्रकाराची गंभीर दखल घेत मंत्री सरनाईक यांनी तातडीने चौकशी समिती नेमून या प्रकरणास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तसेच असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी कडक उपाययोजना करण्यासही सांगितले होते. त्याअनुषंगाने एसटी प्रशासनाने तीन अधिकाऱ्यांची समिती नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी केली. चौकशीमध्ये दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजनाही सुचविण्यात आल्या आहेत. सदर चौकशी अहवाल एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना सादर करण्यात आला असून त्यांच्या निर्देशानुसार दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच समितीने सुचविलेल्या उपाययोजना तातडीने सर्व आगारांमध्ये लागू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नव्या उपाययोजनांनुसार आगारात कामावर हजर होणाऱ्या चालकांची वाहन परीक्षकांच्या माध्यमातून नियमित तपासणी केली जाणार आहे. तसेच वाहकांचीही ड्युटी देण्यापूर्वी अल्कोटेस्ट मशीनद्वारे तपासणी करून त्याची नोंद ठेवणे आवश्यक राहणार आहे. चालक व वाहकांची मद्यपान तपासणी झाली आहे की नाही, यावर सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, सहाय्यक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक आणि वाहतूक नियंत्रक यांनी देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच आगार व्यवस्थापकांनीही नियमित नियंत्रण ठेवून या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बस मार्गावर असताना चालकाने नियंत्रण कक्षात लॉगबुकची नोंद करणे बंधनकारक राहणार आहे. चालकाने नोंद केल्यानंतर त्याची पुन्हा एकदा अल्कोटेस्ट तपासणी करून योग्य नोंद घेतल्यानंतरच पुढील मार्गावर पाठविण्याची सक्ती करण्यात आली आहे. ही तपासणी नियमितपणे होत आहे की नाही, याची खात्री स्थानक प्रमुखांनी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय बसस्थानक व आगार परिसरातील चालक, वाहक आणि विश्रांतीगृहांमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांचीही वेळोवेळी अल्कोटेस्ट मशीनद्वारे तपासणी करून त्याची नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित विभागातील पालक अधिकाऱ्यांनी आगार व बसस्थानक भेटीदरम्यान या उपाययोजनांची अंमलबजावणी तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, या बाबतीत दक्षता विभागाकडून वेळोवेळी गोपनीय तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. मार्गतपासणी पथक, वाहतूक निरीक्षक, प्रशिक्षण विभाग आणि सुरक्षा विभाग यांच्या माध्यमातून तपासणी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Previous Post

युजर्सची प्रतीक्षा संपली! व्हॉट्सॲपवर आता २० चॅट्स ‘पिन’ करता येणार

Next Post

माता-बालमृत्यू दर रोखण्यासाठी तंत्रज्ञानाची साथ! आशा सेविकांच्या मदतीसाठी ‘आशा स्पर्श’ ॲप विकसित

Next Post
माता-बालमृत्यू दर रोखण्यासाठी तंत्रज्ञानाची साथ! आशा सेविकांच्या मदतीसाठी ‘आशा स्पर्श’ ॲप विकसित

माता-बालमृत्यू दर रोखण्यासाठी तंत्रज्ञानाची साथ! आशा सेविकांच्या मदतीसाठी ‘आशा स्पर्श’ ॲप विकसित

BreakingNews

पाळीच्या दिवसातही विद्यार्थिनींना मिळणार हक्काचा आराम; शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिनसह ‘पिंक रूम’ सज्ज

ना पाकिस्तान, ना लियारी! धुरंधरचं शूट पाकिस्तानात नाही तर चक्क बँकॉकला?

स्टंटमॅनच्या मुलानं इतिहास रचला; अजय देवगणचा थक्क करणारा प्रवास!

महिलांना महिना ₹२५०० सह २ गॅस सिलिंडर मोफत मिळणार – भाजपची मोठी घोषणा!

“तुम्ही लढा, स्वतःचे रक्षण स्वतःच करा!” – इंधन टंचाईवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा मित्रदेशांना इशारा

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! आता गुणपत्रक आणि प्रमाणपत्र मिळणार एकत्रित; नावाचा घोळही मिटणार

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.