पुणे : पुणे शहरात ड्रग्ज विक्री करणाऱ्या १७ नायजेरियन नागरिकांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांनी १४ पुरुषांसह तीन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुण्यातील कोंढवा, येवलेवाडी, मांजरी, उंड्री आणि पिसोळी परिसरातून या नायजेरियन लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुणे शहर गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकाकडून छापेमारी सुरू केली होती. या ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज देखील जप्त करण्यात आलं आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नायजेरीयन गँगच्या घरांवर छापेमारी सुरू केली होती. या कारवाईमध्ये १७ नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
पुणे पोलीस नायजेरीयन ड्रग्ज पेडलर आणि ड्रग्ज पुरवणाऱ्या टोळीवर कारवाई केली आहे आहेत. ड्रग्स पुरवणाऱ्या नायजेरीयन नागरिकांच्या निवासस्थानी पोलीस छापेमारी करत आहेत. त्यामुळे पुणे शहरामध्ये एकच दाणादाण उडाली आहे. नायजेरीयन गँगच्या घरांवर पोलीसांनी धाड टाकली होती. पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुणे शहरातील विविध भागात कारवाई केली आहे. त्यांनी कोंढवा, कात्रज, हडपसर, वानवडी या परिसरात असलेल्या नायजेरीयन नागरिकांच्या निवासस्थानावर कारवाई केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे १० पथकांनी ही कारवाई केली आहे. नायजेरीयन गँगच्या घरांवर छापेमारी सुरू आहे. मागील काही दिवसांपासूम पुणे शहरात अमली पदार्थांचा वावर वाढला आहे. पोलिसांना शहरात कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज सापडले होते. या ड्रग्ज प्रकरणाचे नॅशनल इंटरनॅशल कनेक्शन असल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी देशभरात छापे टाकले होते.