Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

ते सर्व गुन्हे एकत्र करण्याची आव्हाड यांची न्यायालयास विनंती; न्यायालयाकडून पोलिसांना नोटीस जारी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडल्याच्या आरोपाप्रकरणी विविध ठिकाणी दाखल केलेले गुन्हे एकत्र करण्याच्या मागणीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 4, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
ते सर्व गुन्हे एकत्र करण्याची आव्हाड यांची न्यायालयास  विनंती; न्यायालयाकडून पोलिसांना नोटीस जारी
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडल्याच्या आरोपाप्रकरणी विविध ठिकाणी दाखल केलेले गुन्हे एकत्र करण्याच्या मागणीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयानेही आव्हाड यांच्या याचिकेची दखल घेऊन राज्य सरकार आणि पोलीस महासंचालकांना नोटीस बजावली व याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. आव्हाड यांच्याविरोधात रायगड आणि पुणे जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल आहेत. ते एकत्रित करण्याच्या मागणीसाठी त्यांनी याचिका केली आहे. न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने सरकारसह राज्याच्या पोलीस महासंचालकांना नोटीस बजावली.

राज्यातील प्राथमिक शाळांच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा मसुदा समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयावरून राज्य सरकारवर विविध स्तरातून टीका झाल्यानंतर, अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा मसुदा समाविष्ट करणार नसल्याचे सरकराने स्पष्ट केले. परंतु, सरकारच्या निर्णयाचा निषेधार्थ आव्हा़ड यांनी २९ मे २०२४ रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तलावाजवळ आंदोलन केले. त्यावेळी, राज्य सरकारचा निषेध करताना आणि वादग्रस्त लिखाण फाडताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्रही फाडले. परंतु, आपल्याकडून चुकून हे छायाचित्र फाडण्यात आल्याचा दावा आव्हाड यांनी याचिकेत केला आहे. या घटनेनंतर, आपल्याविरोधात रायगड जिल्ह्यात दोन, तर पुणे येथील बंडगार्डन पोलीस ठाण्यात एक असे एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले. ते एकत्रित करण्याची मागणी आव्हाड यांनी याचिकेत केली आहे.

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर गोळीबार; उपचारांदरम्यान मृत्यू

Next Post

गोवंडीतील मानखुर्द परिसरात १२ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार

Next Post
गोवंडीतील मानखुर्द परिसरात १२ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार

गोवंडीतील मानखुर्द परिसरात १२ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.