Lokrakshanay
Thursday, July 9, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

डॉक्टरांवरील हल्ला प्रकरण: आंदोलन पेटले, रमेश म्हात्रेंचे नगरसेवकपद धोक्यात!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 9, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
डॉक्टरांवरील हल्ला प्रकरण: आंदोलन पेटले, रमेश म्हात्रेंचे नगरसेवकपद धोक्यात!
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : डोंबिवलीतील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांना छातीत दुखत असल्याची तक्रार झाल्याने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एकीकडे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असताना, दुसरीकडे त्याच रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी हाताला काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन केले. शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांवरील हल्ल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात संताप व्यक्त होत असून, या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रमेश म्हात्रे यांना अटक केली. त्यानंतर प्रकृती अस्वस्थ असल्याचे सांगत त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. आंदोलनादरम्यान “डॉक्टरांवरील हल्ले बंद झाले पाहिजेत” आणि “आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्या” अशा घोषणा देत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदवला. तसेच डॉक्टरांवर हात उगारणाऱ्या लोकप्रतिनिधीला पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे सांगत रमेश म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक तथा वरिष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. धीरज एस. महांगडे यांनी स्पष्ट भूमिका मांडत डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार करणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले. रमेश म्हात्रे यांच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र, उपचार करणे हे कर्तव्य असले तरी डॉक्टरांवरील हल्ल्याचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन करता येणार नाही, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. लोकप्रतिनिधींनी समाजापुढे आदर्श ठेवणे अपेक्षित असताना डॉक्टरांवर हात उचलणे अयोग्य असल्याचे सांगत त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. या आंदोलनात वरिष्ठ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका तसेच विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. रुग्णालयांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करणे, डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांप्रकरणी कठोर कायदेशीर कारवाई करणे आणि दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

Previous Post

दुर्गम भागासाठी एसटीच्या २०० मिनी बस; २०३५ पर्यंत संपूर्ण ताफा इलेक्ट्रिक करण्याचा सरनाईकांचा निर्णय!

Next Post

दिव्यांगांच्या डब्यात अनधिकृत प्रवाशांना नो-एन्ट्री; सुरक्षेसाठी आरपीएफ जवान तैनात!

Next Post
दिव्यांगांच्या डब्यात अनधिकृत प्रवाशांना नो-एन्ट्री; सुरक्षेसाठी आरपीएफ जवान तैनात!

दिव्यांगांच्या डब्यात अनधिकृत प्रवाशांना नो-एन्ट्री; सुरक्षेसाठी आरपीएफ जवान तैनात!

BreakingNews

शिर्डी साईबाबा संस्थानच्या ब्रेक दर्शन शुल्कात वाढ; आता प्रति भाविक ३०० रुपये!

दिव्यांगांच्या डब्यात अनधिकृत प्रवाशांना नो-एन्ट्री; सुरक्षेसाठी आरपीएफ जवान तैनात!

डॉक्टरांवरील हल्ला प्रकरण: आंदोलन पेटले, रमेश म्हात्रेंचे नगरसेवकपद धोक्यात!

दुर्गम भागासाठी एसटीच्या २०० मिनी बस; २०३५ पर्यंत संपूर्ण ताफा इलेक्ट्रिक करण्याचा सरनाईकांचा निर्णय!

‘तारक मेहता…’ मालिका बंद होणार? सेटवरील बांधकामावर निर्माते असित मोदींनी केला मोठा खुलासा!

वसई-विरारमध्ये पाचव्या दिवशीही ट्रॅक्टरच ठरले जीवनवाहिनी; जलमय रस्त्यांमुळे वाहतूक विस्कळीत!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.